रक्‍तसंकलनपासून संक्रमणापर्यंत लागतो खर्च 

रक्‍तसंकलनपासून संक्रमणापर्यंत लागतो खर्च 

जळगाव ः रक्‍तदानाइतके शास्त्रीयदृष्ट्‌या शुद्ध व उपयुक्‍त रक्‍तपुरवठा करण्यासाठी रक्‍तसंकलन केल्यानंतर विविध बाबींवर खर्च होत असतो. रुग्णांना रक्‍ताची पिशवी देताना पैशांची आकारणी का केली जाते? हा प्रश्‍न नव्हे, तर गैरसमज नागरिकांमध्ये आहे. मात्र रक्‍त संकलनापासून ते रक्‍तसंक्रमणापर्यंत अनेक चाचण्या केल्या जातात. त्याला खर्च लागतो. त्यामुळे नाममात्र सेवाशुल्क आकारून ही पिशवी दिली जाते. 

समाजात अनेकजण रक्‍तदान शिबिराचे आयोजन करत असतात. यात शिबिरात स्वच्छेने रक्‍तदान करत असतात. यातून संकलन होणाऱ्या रक्‍ताची साठवणूक खासगी रक्तपेढ्यात करणे खर्चिक आहे. यामुळेच बाराशे ते सोळाशे रुपये प्रति रक्तपिशवी रुग्णांना मोजावे लागते. परंतु रक्‍तदात्याच्या रक्‍ताची किंमत कुबेरही देवू शकणार नाही. याप्रमाणे रक्‍तदात्यांनी रक्‍तदान दिले, तरी रुग्णांना रक्‍ताची पिशवी देताना पैशांची आकारणी का केली जाते? हा प्रश्‍न प्रत्येकाला पडतो. परंतु रक्‍तसंकलनापासून ते रक्‍त संक्रमणापर्यंत विविध बाबींवर लागणारा खर्च म्हणूनच सेवाशुल्क स्वरूपात तो रुग्णांकडून घेतला जात असल्याचे रेडक्रॉस रक्‍तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले. 

पाच तपासण्या व अन्य खर्च 
रक्‍तसंकलन केल्यानंतर त्या करिता लागणारी रक्‍ताची पिशवी, रक्‍तगट तपासणीत एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी., मलेरिया, एस.टी.डी., रक्‍त जुळवणी, रक्तासाठी शितलीकरण, महागडी मशिनरी आणि त्याच्या दुरुस्तीचा खर्च, कर्मचारी वेतन, वीज बिल व जनरेटर, जैविक कचरा निर्मूलन, मुख्य म्हणजे थॅलेसिमियाच्या रुग्णांना विनामूल्य रक्‍त पिशवी वितरणाचा भार. त्याचप्रमाणे शिबिराचा खर्च- वाहन भाडे, कर्मचारी मानधन, कॉफी बिस्कीट यासह इतर खर्च रक्‍तपेढीत लागत असतो. यामुळेच शुद्ध व उपयुक्‍त रक्‍तपुरवठा शक्‍य आहे. मुळात राज्य संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शनानुसार ठरविलेल्या सेवाशुल्कापेक्षा रेडक्रॉस सोसायटीची रक्‍तपेढीतून कमी दरात सेवाशुल्क आकारणी केली जात आहे. 
 
रक्‍तपेढीतील सेवाशुल्क (प्रतिबॅग) 

रक्‍तघटक...........साधी..........नॅट टेस्टेड 
डब्ल्यूएचओ......1450.........2150 
पीसीव्ही...........1350.........2050 
एफ.एफ.पी..........400...........500 
आर.डी.पी...........400..........500 

 

"शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा कमी दर प्रत्येक पिशवी मागे घेत असतो. रक्‍त संकलित करण्यासाठी फोर जनरेशन किट वापरतो. ल्युको रेड्युस, नॅट टेस्टेड रक्‍त देत असतो. एखाद्या गटाचे रक्‍त नसले, तर त्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न रक्‍तपेढीचा आहे.' 

- विनोद बियाणी, मानद सचिव, रेडक्रॉस सोसायटी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com