esakal | दुर्दैवी दुर्घटना...! सुटले नियंत्रण अन्‌ कोसळले पन्नास फुट खोल दरीत 
sakal

बोलून बातमी शोधा

toranmal ghat imege

सातपुड्याच्या दुसऱ्या पायथ्याशी असलेल्या नागार्जुन मंदिराजवळ चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने बोलेरो वाहन दरीत कोसळले

दुर्दैवी दुर्घटना...! सुटले नियंत्रण अन्‌ कोसळले पन्नास फुट खोल दरीत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शहादा ः शिरपुर येथून तोरणमाळ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा वाहनाचा अपघात होऊन वाहन पन्नास फुट दरीत कोसळे. या भिषण अपघातात दोन प्रवासी ठार झाले तर 11 जण जखमी झाले. कालापाणी जवळ सातपुड्याच्या दुसऱ्या पायथ्याशी नागार्जुन मंदिरानजीक ही घटना साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. 

नक्की वाचा : सातपुड्यातील सिकलसेल वर ठोस उपाययोजनांची गरज 
 

महाशिवरात्री निमित्त आज तोरणमाळ येथे हे यात्रा भरते यात्रेसाठी शिरपूर तालुक्‍यातील (एम. एच. 41, 4836) या बोलेरो वाहनाने भाविक तोरणमाळ येथे जात होते. सातपुड्याच्या दुसऱ्या पायथ्याशी असलेल्या नागार्जुन मंदिराजवळ चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने बोलेरो वाहन दरीत कोसळले त्यात तुळशीराम वेलशा पावरा (वय 30,हरी दोंदवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पवन सखाराम पावरा (वय 40) याला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करताना रस्त्यात मृत्यू झाला. दरम्यान, वाहनात सुमारे 15 प्रवासी होते. त्यातील 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी सहा प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने नंदुरबार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे व म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी घटनेची माहिती घेतली. 

क्‍लिक कराः  सत्तापालट होऊनही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कायम...!
 

अपघातातील जखमी असे : अनिताबाई फुलाला पावरा (सेंधवा), मेनका बाई सुनील पावरा 
(वडगांव, सेंधवा), सुनीता सुशील पावरा (शिरपूर,रोहिणी), सुनील लालसिंग पावरा (लाडगाव, सेंधवा ), कविता तुळशीराम पावरा (हरीदोंदवाडा), सुंदरलाल गल्या पावरा (रोहिणी,शिरपूर) राजेश सखाराम पावरा (आंबाखांबा), उमा पवन पावरा (आंबाखांबा), पूजा तुळशीराम पावरा (हरी दोंदवाडा ), साक्षी गोविंदा पावरा( रोहिणी नवापाडा) जितेश भिकला पावरा (आंबाखांबा) असे आहेत. 

आर्वजून पहा : ग्रा.प.निधीचे काय झाले, विचारणाऱ्याची...कापली जीभ