राज्यात 99 लाख नवीन रेशनकार्ड देणार : गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

जळगाव : राज्यात रेशनकार्डावर धान्य वाटप यंत्रणा अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 11 लाख बोगस रेशन कार्ड रद्द झाले आहेत. आता धान्यवाटपाचा इष्टांक शिल्लक आहे, त्यामुळे राज्यांतील 99 लाख लोकांना नवीन रेशनकार्ड देण्यात येणार असून त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जळगाव येथे भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, राज्यातील रेशन धान्य वितरणातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. वितरणासाठी पॉझ मशिनचा वापर सुरू करण्यात आला आहे. तसेच आता रेशन कार्डला आधार लिंकिंग करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील 11 लाख बोगस रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. तब्बल 11 टक्के धान्याची बचत झाली आहे. यातून सरकारचे अडीच हजार कोटी रुपये वाचले आहेत. काळ्या बाजारात जाणारं गरिबांचं धान्य आज बंद झाले असून ते गरिबांना मिळत आहे. तरीही काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे. त्यावरही आपण लवकरच निर्बंध आणणार आहोत. मात्र आता रेशनचा इष्टांक शिल्लक आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 99 लाख नवीन लोकांना धान्य वाटपाचे रेशनकार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या नियमांचे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र करून घेण्यात येत असून या अर्जाच्या मागील बाजूस ते छापण्यात आले असून ते भरून त्या व्यक्तीने द्यावयाचे आहे. ते भरून दिल्यानंतर त्यांना आधारलिंकिंगसह कार्ड देण्यात येईल. राज्यात 92 टक्के आधार लिंकिंग करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon reshan card girish bapat