कुरंगी नदीपात्रातून तीन अवैद्ध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्येवाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

नांद्रा ता.(पाचोरा) : जळगाव जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी गिरणा काठावरील गावातील सरपंच,पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांच्या कमेटीला अवैद्ध वाळू रोखण्यासाठी गाव पातळीवर कमेटी स्थापण करुण कार्येवाहीचे अधिकारी दिले. वाहन जमा करुन महसूलच्या ताब्यात देण्यासाठी लेखी आदेश दिले होते. त्या अनुसंघाने आज सकाळी कुरंगी गिरणा पात्रातुन वाळू वाहतूक सुरु असल्याची माहिती सरपंच यांना मिळाली असता. त्यांनी कमेटी व शेकडो ग्रामस्थांसह गिरणा पात्रात धडक दिली असता. तेथे तीन ट्रँक्टर भरलेले आढळून आले. त्यात ट्रँक्टर (क्र. एमएच.बी.जे.

नांद्रा ता.(पाचोरा) : जळगाव जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी गिरणा काठावरील गावातील सरपंच,पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांच्या कमेटीला अवैद्ध वाळू रोखण्यासाठी गाव पातळीवर कमेटी स्थापण करुण कार्येवाहीचे अधिकारी दिले. वाहन जमा करुन महसूलच्या ताब्यात देण्यासाठी लेखी आदेश दिले होते. त्या अनुसंघाने आज सकाळी कुरंगी गिरणा पात्रातुन वाळू वाहतूक सुरु असल्याची माहिती सरपंच यांना मिळाली असता. त्यांनी कमेटी व शेकडो ग्रामस्थांसह गिरणा पात्रात धडक दिली असता. तेथे तीन ट्रँक्टर भरलेले आढळून आले. त्यात ट्रँक्टर (क्र. एमएच.बी.जे. 8175), (एम.एच.19 बी.क्यू.1608) (एम.एच.बी.जी.7248) हे वाहने पकडून या बाबतीत सरपंच दिपक मोरे यांनी प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी अवैद्ध वाळू वाहतूकीची खबर दिली. प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी तात्काळ दखल घेत तहसिलदार बी. ए. कापसे यांना कुरंगी पाठवले. कापसे यांनी ग्रामथ्य व कमेटीचे ऐकून घेतले व वाहने ताब्यात घेऊन पाचोरा जमा केली. यावेळी पाचोरा येथील ट्रँक्टर मालक यांनी तहसिलदार कापसे यांना मी सिंचनच्या कमासाठी घेऊन जात असल्याचा बनाव केला मात्र घटना स्थळी आर.टी.आय. कार्येकर्ता गणेश पाटील यांनी तहसिलदार कापसे यांना रविवारची परवानगी दिली जाते का अशी विचारणा करुण संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केले. यावेळी सरपंच दिपक मोरे, तंटामुक्तचे अध्यक्ष नामदेव पाटील, ग्रा.प.सदस्य विठ्ठल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, विष्णू कोळी, आबा भोई, भगवान ठाकरे, राजू भोई यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon river vadu tractor