आरटीई प्रवेशात मुक्ताईनगर, बोदवडची आघाडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

जळगाव : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून "आरटीई' योजनेंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरिता 16 तालुक्‍यात 261 शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यात जिल्ह्यात 69.35 टक्के प्रवेश झाले. मुक्ताईनगर व बोदवड या तालुक्‍यात सर्वाधिक प्रवेश झाले आहे तर जळगाव व जळगाव मनपामध्ये सुमारे 392 जागा रिक्त राहिल्या आहे. 

"आरटीई'अंतर्गत जिल्ह्यातील 261 इंग्रजी शाळांमध्ये 3 हजार 817 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 हजार 219 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दुसऱ्या फेरीत 798, तिसऱ्या फेरीत 541, चौथ्या फेरीत 73 तर पाचव्या फेरीत 16 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. एकूण 2 हजार 647 विद्यार्थ्यांनी फेरीत प्रवेश घेतले असून 1 हजार 170 जागा रिक्त राहिल्या आहे. गेल्या वर्षी 1 हजार 586 जागा रिक्त राहिल्या होत्या. तुलनेत यंदा कमी जागा रिक्त राहिल्या असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. 
 
मुक्ताईनगरला सर्वाधिक प्रवेश 
जिल्ह्यात सर्वत्र आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यात मुक्ताईनगर तालुक्‍यात अकरा शाळांमध्ये 126 जागा उपलब्ध होत्या. यात 118 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून सुमारे 94 टक्के प्रवेश झाले आहे. तर जळगावात तालुक्‍यात 57.79 टक्के व जळगाव मनपात 61.07 टक्के प्रवेश झाले आहे. यात सुमारे 392 जागा रिक्त राहिल्या आहे. 
 
शेवटच्या फेरीत 16 प्रवेश 
दरवर्षी आरटीई प्रवेशासाठी चार फेऱ्या घेण्यात येतात. यंदा प्रवेश कमी झाल्याने पाच फेऱ्या घेण्यात आल्या. मात्र पाचव्या फेरीला फक्त सोळाच प्रवेश झाले. शिक्षण विभागांतर्गत यंदा प्रवेशाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ऑनलाइन माहिती, संदेश पाठविणे यांसारख्या सुविधा देखील पुरविण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील विद्यार्थी व पालकांनी संपर्क साधला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon RTE admition 70 parcant