शहादा परिसरात 3.2 रिस्टर स्केल भुकंपाचे धक्‍के; पालघर केंद्रबिंदू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

शहादा ः प्रकाशा रस्ता परिसर स्वामी विवेकानंदनगर व त्या भागातील नवीन वसाहती आज सकाळी नऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सावळदा (ता. शहादा) येथील भूकंप मापन केंद्रावर या धक्‍क्‍यांची नोंद झाली असून सुमारे 3.2 रिश्‍टर स्केल हे धक्के असून त्याचा केंद्रबिंदू पालघर आहे 

शहादा ः प्रकाशा रस्ता परिसर स्वामी विवेकानंदनगर व त्या भागातील नवीन वसाहती आज सकाळी नऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सावळदा (ता. शहादा) येथील भूकंप मापन केंद्रावर या धक्‍क्‍यांची नोंद झाली असून सुमारे 3.2 रिश्‍टर स्केल हे धक्के असून त्याचा केंद्रबिंदू पालघर आहे 
प्रकाशा रस्त्याच्या परिसरात आज सकाळी पवणे नऊ ते साडेनऊ वाजेदरम्यान नागरिकांना अचानक जमीन हलत असल्याचे जाणवले. सर्वप्रथम नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुन्हा पंधरा मिनिटाच्या कालावधीनंतर जमिन हालत असल्याचे अनुभवास आल्यानंतर हा धक्का भूकंपाचा धक्का असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच विसरवाडी खेतीया महामार्गाच्या कोळगाव ते खेतीया या भागात रस्त्याचे काम सुरू आहे. सदरचा रस्ता हा शहादा शहरातून जात आहे .या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात खडी मुरूम व माती आणली जात आहे. अवजड मशनरी जेसीबी पोकलॅंड यांच्या साह्याने काम सुरू आहे. या रस्त्यावर कुठल्यातरी अवजड मशनरीच्या साह्याने काम सुरू असून त्याचे कंपन जाणवत असल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांकडून वर्तवला जात होता. मात्र दुसरा धक्का बसल्याने व तो पहिल्या धक्‍यापेक्षा जास्त असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. अनेक नागरिकांनी खात्री करण्यासाठी रस्त्याच्या कामावर आले असता तेथे कुठल्याही अवजड मशनरीचे काम सुरू नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते दोघे धक्के भूकंपाचे असल्याचे खात्री झाली. 
याबाबत घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी तहसीलदार मनोज खैरनार यांना घटनेची कल्पना दिली. श्री. खैरनार यांनी सावळदा (ता. शहादा) येथील नर्मदा सरोवराचे भूगर्भातील हालचालीची नोंद घेणारे तसेच भुकंप मापन केंद्रास चौकशी करून माहिती देण्यास सांगितली. स्वतः त्या केंद्रास भेट देऊन माहिती जाणून घेतली असता शहाद्यात 3.2 रिश्‍टर स्केलचे भूकंपाचे धक्के सकाळी सव्वानऊच्या सुमारास जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पालघर आहे. गेल्या काही दिवसांपासून पालघर व परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत आहे जाणवलेले भूकंपाचे धक्के केंद्रबिंदू पालघर असल्याचे स्पष्ट झाले. 

आज सकाळी सव्वानऊ वाजता शहरात भूकंपाचे धक्के जाणवले असेल तरी कुठलिही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी भयभीत होऊ नये त्याचप्रमाणे अफवांवर विश्वास ठेवू नये भूकंपाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल 

- मनोज खैरनार, तहसीलदार शहादा. 

Web Title: marathi news jalgaon sahada earthquake 3-2 rister scale