सहकार महर्षी उदेसिंहअण्णा पवार यांचे निधन 

udeshing pawar
udeshing pawar

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील सहकार महर्षी, राजकारण, समाजकारणासह शिक्षण, सहकार व सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रात योगदान देतांना उदेसिंहआण्णा पवार यांनी आज पहाटे साडेसहा वाजता वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सहकार क्षेत्रातील व्यकतीमत्व हारपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वरखेडे (ता.चाळीसगाव) गावाचे भुषण व तालुक्‍याचे भाग्यविधाते, सहकारमहर्षि स्व. रामराव (जिभाऊ) पाटील हे अण्णांचे खरे प्रेरणास्त्रोत. त्यांच्या समाजवत्सल सावलीत अण्णांना सामाजिक काम करण्याची स्फूर्ति मिळाली. अण्णांनी सहकार क्षेत्रात पाऊल ठेवले तो काळ या चळवळीच्या पायाभरणीचा होता. घरावर तुळशीपत्र ठेऊन समाजकारण करण्याची 'हौस' असणारी पिढी गावोगावी पुढे आली होती. चाळीसगाव तालुक्‍याची ही पालखी अण्णांनी खांद्यावर घेतली. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते ही पालखी दिमाखाने आणि आनंदाने मिरवत राहिले. सहकार आणि शिक्षण संस्था समाजविकासाची तीर्थस्थळे असावीत. असे आत्मभान ठेवत अण्णांनी संस्थांचे कुदळ मारले. संस्थांमधील पावित्र्य हा त्यांच्या अस्थेचा विषय होता. लोकनेते (कै.) अनिलदादा देशमुख यांच्याशी त्यांचे वैचारिक रुणानुबंध होते. या जोडगोळीने चाळीसगाव तालुक्‍याच्या सर्वांगिण आणि चौफेर विकासाची स्वप्ने पाहिली. विशेष म्हणजे ती साकारही केली. 

अनेक संस्थांना दिले बळ 
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी, बेलगंगा साखर कारखाना, सर्वोदय शिक्षण प्रसारक, शेतकरी सहकारी संघ, चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ, मिल्क युनियन, जिल्हा लोकल बोर्ड...आदी अनेकविध संस्थांमधील अण्णांचे योगदान शब्दांतित आहे. या संस्था अण्णांच्या नेतृत्वामुळेच अधिकच बहरल्या. 

सायंकाळी अंत्ययात्रा 
अत्यंत साधी राहणी अण्णांचा व्यक्तिमत्व गूण त्यांच्या साधनसूचितेची ओळख जपणारा होता. प्रसिद्धी पासून ते नेहमीच लांब राहिले. उच्चविद्याविभूषित अण्णांचे पुस्तकांवर विशेष प्रेम होते. सर्जनशीलता आणि रसिकता त्यांच्या प्रतिभासंपन्न जीवनाचे दोन अभिन्न अंग होते. थेट बोलणे हा त्यांच्या संवाद आणि भाषणांचा गाभा असे. म्हणूनच त्यांना ऐंकणे ही पर्वणी ठरायची. शिस्तप्रियता आणि स्वतःचे जीवन यांचा मेळ त्यांनी सार्वजनिक जीवनातही तितक्‍याच कठोरपणे निभावला. त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता वरखेडे (ता.चाळीसगाव) येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com