संत सखाराम महाराजांचा जयघोष
संत सखाराम महाराजांचा जयघोष
अमळनेर : सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवास आज सकाळी येथील बोरी पात्रात स्तंभारोपणाने प्रारंभ झाला. संत सखाराम महाराजांचे गादीपुरूष प्रसाद महाराज यांनी खडीसाखरेचा प्रसाद व निमंत्रण पत्रिका देऊन परंपरेप्रमाणे यात्रोत्सवाचे भाविकांना निमंत्रण दिले.

बोरी पात्रातील संत सखाराम महाराजांच्या समाधी स्थळासमोर अभय देव व जयदेव यांनी ढोल ताशांच्या गजरात स्तंभाचे पूजन करून स्तंभारोपण केले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. पाटील, प्रांताधिकारी संजय गायकवाड, पोलिस उपअधीक्षक रफीक शेख, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, कार्यवाह एस. व्ही. जोशी, विश्वस्त सुभाष भांडारकर, बापू देशमुख, सुधाकर येवले आदींसह भाविकांची मोठी उपस्थिती होती.