आठ दिवसाच्या मुलास मारून फेकेले नाल्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

सावदा : आठ दिवसाच्या लहान मुलास निर्दयपणे मारून नाल्यात फेकून दिल्याची धक्‍कादायक घटना रोझोदा शिवारात घडली आहे. यातील संशयीतास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मुलाच्या जन्मदात्या आईने पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयिताविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सावदा : आठ दिवसाच्या लहान मुलास निर्दयपणे मारून नाल्यात फेकून दिल्याची धक्‍कादायक घटना रोझोदा शिवारात घडली आहे. यातील संशयीतास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मुलाच्या जन्मदात्या आईने पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयिताविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांची माहीती अशी की, फिर्यादी सलीमा हबीब तडवी (वय 19, मोठा वाघोदा धंदा मजुरी रा.भोईवाडा) व संशयीत अकबर इतबार तडवी हे केळी घड वाहण्याचे काम करत असतांना त्यांची ओळख झाली. ते लग्न न करता जळगाव येथे एकत्र राहीले. त्यांचे शाररीक संबध आल्याने (ता. 2) त्यांना एक मुलगा झाला. संशयीत अकबर इतबार तडवी (रा.सावखेडा) याने (ता.8) सायंकाळी साडे सात वाजता मुलाला दवाखान्यात तपासणीसाठी घेवून जातो असे सांगून काल (ता.9) दुपारी साडे तीन वाजता मुलास जिवे ठार मारले, अशी फिर्याद सलीमाने पोलिसात दिली. 
सलीमाची तक्रारीनुसार तातडीने सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक मनोज खडसे, हवालदार कोमलसिंग पाटील, देवेंद्र पाटील, प्रशांत चिरमाडे, अनिल पारधी, जगदीश पाटील, सुरेश अढायगे आदींनी संशयीत तडवीची शोध मोहीम राबवून त्यास ताब्यात घेतले. त्याला सोबत घेवून बाळाचा शोध सुरू केला असता त्याने मुल मारून टाकून ते खिरोदा-रोझोदा रस्त्यावर रोझोदा गावाजवळील स्मशान भुमीजवळील गावाचे सांडपाण्याच्या नाल्यात फेकून दिल्याचे दाखविले. 
अवघ्या आठ दिवसाच्या निरागस कोवळया मुलाचा मृतदेह पाहून पोलिसांचे अंगावरही शहारे आले. लहान मुलाचा मृतदेहाचे रावेर येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी मुक्‍ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे, फैजपूरचे राजेंद्र रायसिंग यांनी भेट दिली. पोलिस अधीक्षक जळगाव व अप्पर पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: marathi news jalgaon savda 8 day child deaith