सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

जळगाव ः उत्राण (ता. एरंडोल) येथील अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले आहे. कर्जाचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांची जमिनी सावकाराने घेतल्या असून, जास्तीची रक्‍कम मागत असल्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून उत्राण येथील एका शेतकऱ्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 
उत्राण येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी सावकाराकडून दोन- तीन वर्षापुर्वी कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड होवू न शकल्याने सावकाराकडून शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू झाले होते. शिवाय संबंधीत शेतकऱ्यांच्या जमिनी देखील ताब्यात घेवून जादा पैशांची मागणी करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. याबाबत या शेतकऱ्यांनी काही दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील केले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सावकारावर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. आजपर्यंत सावकारावर कारवाई झाली नसून, सावकार शेतकऱ्यांनी घरी जावून पैशांची मागणी करत आहे. सावकाराच्या या जाचाला कंटाळून उत्राण येथील डिगंबर चिंता मराठे या शेतकऱ्याने दुपारी एकच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी गावातील काही शेतकरी देखील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com