इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून गणवेश खरेदीसाठी सक्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

जळगाव : जिल्ह्यातील शाळांना सुरवात झाली असून, यंदा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांची भरमसाट लूट केली जात आहे. एका विशिष्ट दुकानातूनच गणवेश खरेदीसाठी सक्ती करून जीएसटीची लाखोंची चोरी केली जात आहे. त्यामुळे अशा शाळांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण समिती सदस्य रवींद्र पाटील यांनी अतिरिक्त "सीईओ' संजय मस्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

जिल्हाभरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ठराविक दुकानदारांकडून गणवेश खरेदीचे आदेश दिले जात आहे. हे गणवेश जळगाव येथे होलसेल भावात दोनशे ते अडीचशे रुपयांना मिळतात. परंतु हाच गणवेश ठराविक दुकानदारांकडून खरेदी करण्याचे बंधन पालकांना दिले जात आहे. त्यामुळे आठशे ते नऊशे रुपयांना म्हणजेच तिप्पट किमतीत पालकांना हा गणवेश खरेदी कराव्या लागत आहे. यासोबतच पालकांना क्रीडासाठी स्वतंत्र असा गणवेश या नावाने आणखी दोन गणवेश खरेदी करण्यास सांगितले जात असल्याने तब्बल दोन हजार रुपये अधिक खर्च होत आहे. हे केवळ शाळांच्या प्राचार्य व संस्थाचालकांच्या टक्केवारीच्या हव्यासापोटी होत असल्याचा आरोप या निवेदनाद्वारे केला आहे. 
 
खरेदीची बनावट पावती 
पालकांना गणवेशाचे व पुस्तक खरेदीचे बिल दिले जात नाही किंवा केवळ बनावट पावती दिली जात असल्याचा आरोप देखील रवींद्र पाटील यांनी केला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा जीएसटी चोरला जात आहे. भुसावळ शहरातील मोठ्या शाळांनी यातून मोठे अर्थकारण साधले आहे. 
 
दुकानदारांवर कारवाई व्हावी 
भुसावळ येथील शाळा संस्थाचालकांनी एकमत करून एका विशिष्ट दुकानांमधून गणवेश घेण्याचा ठेका दिला आहे. एकच दुकान असल्याने दुकानदार पालकांसोबत अरेरावी करण्यास जरासुद्धा विचार करत नाही. त्यामुळे भुसावळ तालुक्‍यासह जळगाव जिल्ह्यातील शाळा संस्थांची चौकशी करून मान्यता रद्द करावी व जीएसटी चोरी करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी निवेदनातून केली आहे.

Web Title: marathi news jalgaon school dress english mediam