सनई वादन शिकविणारे गुरूच नाही : गजानन साळुंखे

सनई वादन शिकविणारे गुरूच नाही : गजानन साळुंखे

जळगाव ः सनई वादन म्हटले म्हणजे मंगल कार्यातील वादन. तेवढ्या कार्यक्रमापुरता सनई वादक दिसतात. इतर वेळेला मात्र सनई वादक नागरिकांच्या नजरेस पडत नाही. त्यांना चांगले प्लॅटफॉर्म मिळत नाही. अशा परिस्थितीत देखील सनई वादन शिकणारे शिष्य आहेत; मात्र त्यांना शिकविणारे गुरू नसल्याची खंत सनई वादक गजानन साळुंखे यांनी व्यक्‍त केली. 

बालगंधर्व संगीत महोत्सवात आज सादर होणाऱ्या कलाविष्कारापूर्वी सनई वादक गजानन साळुंखे व कथ्थक नृत्यकार पंडित दीपक महाराज यांनी संवाद साधला. साळुंखे यांनी सांगितले, की सनई शिकण्यासाठी माझ्याकडे पंधरा शिष्य आहेत. शिकण्यासाठी येणाऱ्या नवीन शिष्याकडून फी घेत नसून, ते आल्यानंतर त्यांना प्रथम स्वतः सनई घेऊन देत असतो. सनई वादन करण्यासाठी शिष्य येतात, पण त्यांना शिकविणारे पुरेसे गुरूच नाहीत. आज गावागावात सनई वादक आहेत. पण त्यांना अपेक्षित प्लॅटफॉर्म मिळत नाही. सनईमध्ये पूर्वी क्‍लासिकल वाजविले जात होते. आज हे बंद झाले, असून चित्रपट गीत वाजविले जातात. कारण लोकांना जे आवडते तेच वाजविणे भाग पडते. पण सनई वादनासाठी अभ्यास हवा, याशिवाय यशस्वी होऊ शकणार नसल्याचे साळुंखे यांनी सांगितले. 
........ 
गुरूची छबी आल्यास प्रभावी सादरीकरण ः पंडित दीपक महाराज 
शास्त्रीय गायन, कथ्थक काहीही असो, आपण जे करतो ते मनापासूनच करायला हवे. ज्या गुरूने आपल्याला शिकविले; त्यांची छबी आपल्या कलेतून उमटली तरच सादरीकरण प्रभावी होऊ शकते असे मत पंडित दीपक महाराज यांनी व्यक्‍त केले. गुरू आणि शिष्यातील नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की गुरू- शिष्य परंपरा कायम असली तरी यात बदल झालेला आहे. कारण काळानुसार बंदिश बदलल्या, रसिक देखील बदलले आहेत. मुले शिकतात पण त्यांच्या आवडी खूप असल्याने एक झाले की दुसरे पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. कथ्थक नृत्याबद्दल विदेशात खूप आकर्षण असून, ते विश्‍वासाने केले तर निश्‍चितच चांगले होऊ शकते; असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्‍त केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com