‘शिवभोजन’ ठरतेय वरदान; जिल्ह्यात रोज 850 फूड पॅकेटचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

लॉकडाऊन काळात शिवभोजन अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात जळगाव शहरातील 9 केंद्राद्वारे व मुक्तानगर तालुक्यात एकूण 850 थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे.

जळगाव : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नयेयासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आला आहे. संचारबंदी लागू आहे. यामुळे बेघर, निराश्रीत, बेघरांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र शासनाच्या ‘शिवभोजन’ थाळी योजने अंतर्गत या निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या भोजन मिळत आहे. लॉकडाऊन काळात शिवभोजन अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात जळगाव शहरातील 9 केंद्राद्वारे व मुक्तानगर तालुक्यात एकूण 850 थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवभोजन’ थाळी ची घोषणा केली. केवळ घोषणा केलीच नाहीतर अंमलताही आणली. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन योजनेने महाराष्ट्रात उपलब्ध केली.
कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी योजना उपयोगी ठरत आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी कोरोनाच्या काळात ही योजना अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन प्रशासन राबवित आहे. जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ही योजना केवळ जळगाव शहरात 9 ठिकाणी सुरू आहे. कोरोना प्रादुर्भाव झाल्यामुळे संचारबंदीच्या काळात ही उपाययोजना नूकतीच मुक्ताईनगरला ही योजना सुरू झाली आहे.

थाळी पॅकींगद्वारे..
सध्या जिल्ह्यात 825 थाळी वाटप केल्या जात आहे. शिवभोजन थाळीचे स्वरूप संचार बंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे.बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू ,गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील दिले जात आहे.

जिल्ह्यात शिवभोजन केंद्राद्वारे मंजूर पॅकींग थाळी अशा
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय कॅन्टीन-75
शासकीय जिल्हा रुग्णालय-100
नवीन बसस्थानक-75
रेल्वे स्टेशन परिसर-75
गोलाणी मार्केट परिसर-75
तहसिल कार्यालयाजवळ-75
शनिपेठ, बळीरामपेठ, भाजीबाजार चौक-75
कृषी उत्पन्न बाजार समिती-75
रेल्वे मालधक्का–75
मुक्ताईनगर तालुका–100.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shibhojan thali lockdown peraid deally 850 packet distribute