esakal | राणे शिवसेनेमुळेच मुख्यमंत्री बनले...आणि रस्त्यावर ही आले ः मंत्री गुलाबराव पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

rane patil

सद्या देशात "कोरोना' विषाणूचा फैलाव वाढत असून चितेंची बाब असून देशावर संकट आलेले आहे. अशा परिस्थीत सर्वांनी एकत्र येवून लढा दिला पाहिजे.

राणे शिवसेनेमुळेच मुख्यमंत्री बनले...आणि रस्त्यावर ही आले ः मंत्री गुलाबराव पाटील 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः शिवसेनेची सत्ता आल्यावर शिवसेनेच नारायण राणेना मुख्यमंत्री करून त्यांना मोठे केले. त्यानंतर सेना सोडली आणि त्यांना शिवसेनेच रस्त्यावर आणले. त्यामुळे त्यांचे नाते प्रेमाचे असल्याचा शाब्दीक टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना लगावला. 

नक्की वाचा :  सद्य:स्थितीत राज्यात राजकीय उलथापालथ होणे अशक्‍य : एकनाथराव खडसे 
 

सद्या देशात "कोरोना' विषाणूचा फैलाव वाढत असून चितेंची बाब असून देशावर संकट आलेले आहे. अशा परिस्थीत सर्वांनी एकत्र येवून लढा दिला पाहिजे. परंतू अशा परिस्थीती काही राजकारणी राजकारण करत आहे. त्यात नाराणय राणे सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची भेट घेऊन कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यात राज्यसरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर आज घेतांना शिवसेनेचे मुलूकमैदान तोफ तसेच पाणीपुरवठा व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंचा खरपुस समाचार घेतला. ही वेळ राजकारण करण्याची नसून आपत्ती काळात 
सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले. 


राजवट त्यांनी गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये आणावी 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव केवळ महाराष्ट्रातच आहे असे काही नाही तो संपूर्ण जगात आहेत. सर्वत्र या विषांणूमुळे कहर आहे. मात्र राणेंना महाराष्ट्रातच कोरोना दिसत आहे. गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली येथे देखील कोरोना आहे तेथे देखील त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करावे असा टोला राणेंना मंत्री पाटील यांनी लगावला.