जळगाव, रावेर लोकसभा शिवसेना स्वबळावर लढणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

जळगाव : जळगाव, रावेर लोकसभा तसेच आगामी सर्व विधानसभा शिवसेना स्वबळावरच लढणार आहे.कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे अवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे केले आहे.सद्या दोन्ही लोकसभा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. जळगाव महापालिकेबाबत कोणतीही चर्चा केली नाही, त्यामुळे निवडणूकीतील "युती'बाबत संभ्रमाची स्थिती कायम आहे. 

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी बैठकिस उपस्थित होते. जळगाव व रावेर लोकसभा क्षेत्राची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. राज्याचे सहकाराज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते. याबाबत माहिती देतांना महानगरप्रमुख शरद तायडे यांनी सांगितले, जळगाव, रावेर लोकसभा मतदार संघ शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारी लागावे,बुथ प्रमुख तसेच बुथची रचना करावी. या शिवाय विधानसभाही स्वबळावर लढण्यात येणार असून विधानसभा निहाय मतदार संघातही जोमाने कार्य करण्याचे त्यांनी अवाहन केले. जळगाव महापालिका निवडणूकीबाबत यावेळी चर्चा झाली नसल्याचेही त्यानी सागितले. 
नाशिक येथे जळगाव महापालिकेच्या निवडणूकीबाबत चर्चेची शक्‍यता व्यक्त करण्यात आली होती. पक्षाचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यानीं भाजपशी युती करण्याचे संकेत दिले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चर्चा होण्याची शक्‍यता होती. मात्र या बैठिकला माजी मंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणूकीतील भाजप-सेना युती बाबत संभ्रम कायम आहे.जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी या बैठकिला उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon shivshena