esakal | अरेच्चा... खराब रस्ते दाखविण्यासाठी..चक्क महापौरांना चालवावी लागली दुचाकी ! 
sakal

बोलून बातमी शोधा

अरेच्चा... खराब रस्ते दाखविण्यासाठी..चक्क महापौरांना चालवावी लागली दुचाकी ! 

महापौर स्वतः दुचाकीवर अधिकाऱ्यांसह पिंप्राळा परिसरात फिरल्या. त्यानंतर महापौरांनी दिलेल्या सुचनेनंतर लागलीच अमृत योजनेसाठी खोदलेल्या चाऱ्यांच्या डागडुजीचे आणि आवश्‍यकता असलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

अरेच्चा... खराब रस्ते दाखविण्यासाठी..चक्क महापौरांना चालवावी लागली दुचाकी ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः शहरात अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय अतिशय दयनीय झाली आहे. नागरिकांना अक्षरशा जातांना जीव मुठीत तसेच तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून आज महापौर भारती सोनवणेंनी महापालिकेत झालेल्या बैठकीत मनपा प्रशासन, मक्तेदार आणि मजीप्रा अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच स्वःता दुचाकी चालवत तसेच अधिकाऱ्यांना दुचाकीवर घेवून होणाऱ्या त्रासाची जाणीव या पाहणीद्वारे दिली. 

क्‍लिक कराः "कोरोनाचा'  चिकन खवय्यांनी घेतली धास्ती...पोल्ट्री व्यवसायावर ‘कोरोना’चे संकट 
 

मनपात महापौर भारती सोनवणे यांनी अमृतचे मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे, मनपा अधिकारी सुनील भोळे व मजीप्रा अधिकारी ए.जी.पाटील, मनपात बैठक घेतल्यानंतर लागलीच त्या कामाची प्रत्यक्षात पाहणीसाठी पिंप्राळा परिसरात फिरल्या. यावेळी महिला बालकल्याण सभापती शोभा बारी, नगरसेवक कैलास सोनवणे, कुलभूषण पाटील, आबा कापसे, सुरेश सोनवणे, शफी शेख आदी उपस्थित होते. 
पिंप्राळा येथे महापौर स्वतः दुचाकीवर अधिकाऱ्यांसह पिंप्राळा परिसरात फिरल्या. त्यानंतर महापौरांनी दिलेल्या सुचनेनंतर लागलीच अमृत योजनेसाठी खोदलेल्या चाऱ्यांच्या डागडुजीचे आणि आवश्‍यकता असलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

नक्की वाचा :  नेत्यांचे फोटो होळीमध्ये दहन करत... शेतकऱ्यांनी ठोकल्या बोंबा ! 
 

या ठिकाणी केली पाहणी 
महापौर यांनी निसर्ग कॉलनी, गणपती नगर, सेंट्रल बॅंक कॉलनी, पिंप्राळा परिसरात पाहणी केली. गल्लीबोळात फिरून, चिखलातून मार्गक्रमण करीत असताना संबंधित मक्तेदाराला पाईपलाईनसाठी खोदलेल्या चाऱ्या लागलीच बुजवून त्याठिकाणी डांबरीकरण करण्याचे सांगितले तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमृत योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांची सर्व डागडुजीची कामे मार्गी लावण्याचे आदेश केले. 
 

loading image