स्मार्ट ट्रॅव्हलर बॅग लयी भारी 

श्रीकांत जोशी
Friday, 27 December 2019

भुसावळ : आपली कल्पकता लढवत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील विद्यार्थ्यांनी स्मार्ट ट्रॅव्हलर बॅग तयार केले आहे. प्रवासात बसण्यासाठी खुर्ची, छत्री, चार्जिंग पॉईंट, लाईट अशा अनेक सुविधा या बॅगेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

भुसावळ : आपली कल्पकता लढवत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील विद्यार्थ्यांनी स्मार्ट ट्रॅव्हलर बॅग तयार केले आहे. प्रवासात बसण्यासाठी खुर्ची, छत्री, चार्जिंग पॉईंट, लाईट अशा अनेक सुविधा या बॅगेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

तालुक्यातील साकेगाव परिसरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विज्ञान व इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन सुरू आहे. आपली कल्पकता लढवत सौर ऊर्जेचा खुबीने वापर करत विविध उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू शाळेचे नववीतील विद्यार्थी नोमान पठाण, मोहम्मद शमशुलहुदा यांनी स्मार्ट ट्रॅव्हलर बॅग तयार केली आहे.

नक्‍की पहा > त्याने कागदावर काढले अपघाताचे चित्र आणि पुढे जे काही घडले थरकाप उडविणारे... 

यात बॅगेच्या कव्हरवर सोलर पॅनल बसवले असून आतमध्ये बॅटरी ठेवण्यात आली आहे. याबॅटरी च्या साह्याने वरच्या भागात मोबाईल चार्जिंग पॉईंट, अंधारात बाहेरचे दिसावे म्हणून लाईट, बॅग उघडल्यानंतर हातातलं सामान काढता यावे म्हणून आतही लाईट ठेवण्यात आला आहे. शिवाय प्रवासात गर्दी असल्यास बसण्याससाठी फोल्डींग खुर्चीची व्यवस्था करण्यात येते. जर कुठे ऊन, पाऊस असेल तर या बागेला फोल्डिंगची छत्री जोडण्यात आली आहे तिचा दांडा वर सरकवल्यास छत्री उघडते. अशी सोय करण्यात आली आहे. या सर्व सुविधा आहेत. बॅग जड झाली तरी खालच्या बाजूला मजबूत चार चाके असल्याने ती सहज वाहून नेणे शक्य आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. या बॅगेत विषयी प्रदर्शन पाहणाऱ्यांनी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon smart traval bag nandurbar student present