धूम्रपानधारक पकडण्यासाठी "स्मोक झोन डिटेक्‍शन'! 

live photo
live photo

जळगाव ः जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी "स्मोक झोन डिटेक्‍शन सिस्टिम' उपकरणाची निर्मिती केली आहे. या संशोधन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी मदत होणार आहे. 
शाळा, महाविद्यालय, शासकीय, खासगी कार्यालयांसह कंपनी, रेल्वे, बसस्थानक, उद्यान आदी सार्वजनिक ठिकाणी या तंत्रज्ञांचा वापर करता येऊ शकतो आणि धूम्रपान व मद्यपान करण्यास रोख लावू शकतो. "स्मोक झोन डिटेक्‍शन सिस्टिम' तयार करण्यासाठी सुमारे पंधरा हजारांचा खर्च आला आहे. संशोधक विद्यार्थी अंजली वाणी, गौरी नेवे, रश्‍मी चौधरी व प्रेरणा खडके अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रा. गणेश धनोकार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, विभागप्रमुख प्रा. सोनल पाटील, प्रा. हिरालाल साळुखे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव यांनी अभिनंदन केले. 
 
असे आहे "स्मोक झोन डिटेक्‍शन' उपकरण 
"स्मोक झोन डिटेक्‍शन सिस्टिम'च्या निर्मितीसाठी रास्पबेरी पाय-3, गेस सेन्सर, स्मोक सेन्सर, बजर, एमक्‍यू-3 सेन्सर, व डेशबोर्ड यांची आवश्‍यकता राहील. उपकरण हाताळण्यासाठी व्यक्तीची आवश्‍यकता नाही. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना सात महिन्यांचा कालावधी लागला. उपकरणाची प्रमुख विशेषतः म्हणजे त्याच्या पन्नास ते शंभर मीटर अंतराच्या आत धूम्रपान किंवा मद्यपान केले असल्यास त्याची माहिती मशिनद्वारे कळते. या तंत्रज्ञानामुळे वातावरणातील प्रदूषित घटक शोधून ते प्रभागसुद्धा "सिस्टिम डिस्प्ले' करीत असते. दूषित वातावरणाची माहिती संबंधित व्यक्तीच्या ई-मेल सिस्टिमवर पाठविण्याचीसुद्धा व्यवस्था उपकरणात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या दूषित वातावरणाची लगेच माहिती मिळविता येऊ शकते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com