"स्नेहाच्या शिदोरी'तून भागवली सव्वादोन लाख गरजूंची क्षुधा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

आजच्या शुभदिनी आम्ही सविनय सांगू इच्छितो, की हाती घेतलेले हे पवित्र कार्य "लॉकडाउन' काळात अविरत सुरू ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आई-वडिलांचे व ज्येष्ठांचे आशीर्वाद आहेतच. आपल्या सर्वांच्या सद्‌भावना प्रार्थनीय आहेत. 
- अशोक जैन 

 

जळगाव : "कोरोना' संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभरापासून "लॉकडाउन' सुरू असून, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या आणि अशा असंख्य गरजूंच्या दोन वेळच्या खाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून जैन इरिगेशन सिस्टिम्स, जैन चॅरिटीजतर्फे दररोज गरजू, गरिबांना फूड पॅकेटस्‌ वितरित करण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे सव्वादोन लाखांची क्षुधा यातून भागविण्यात आली आहे. 

आर्वजून पहा : अरेच्चा पुन्हा मद्यतस्करी......चक्क मिनरल वॉटरच्या खोक्‍यांमध्ये "बंफर' 
 

आज अक्षय तृतीयेचा पवित्र सण. अक्षय समृद्धीचे पूजन, शुभ संचिताचे स्मरण. या शुभमुहूर्तावर सात्त्विक संकल्प केले जातात. याच विचारातून आणि आई-वडिलांच्या, म्हणजे भवरलालजी व कांताईंच्या पावलांवर पाऊल ठेवून एक पवित्र कार्य हाती घेतले आहे. निसर्ग व शेतमाउलीने मुक्तहस्ताने दिलेले "अन्न हे पूर्ण ब्रह्म' गरजूंना उपलब्ध करून देण्याच्या आमच्या "स्नेहाची शिदोरी' या कार्याच्या माध्यमातून, "लॉकडाउन'च्या या बिकट काळात सव्वादोन लाखांहून अधिक लोकांना भोजन तयार करून ते पुरविण्याचे कार्य विविध सेवाभावी संस्था व स्वयंसेवकांच्या सहकार्याने करता आल्याचे अंत:करणात समाधान आहे, अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी या कामानिमित्त बोलून दाखवली. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Sneha's Shidori" quenches the hunger of the needy by jain company!