बालपणात विखुरलेली मैत्री पुन्हा घट्ट! 

live photo
live photo

जळगाव ः जिल्ह्यातील शेंदुर्णी नगरीत साधारण 55 वर्षांपूर्वी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जळगाव येथे रंगला. "बचपन ते पचपन' या स्नेहमेळाव्यात 1996 मध्ये अकरावीनंतर वेगळे झालेले 35 मित्र वयाच्या सत्तरीत एकत्रीत येवून आपल्या बालपणीच्या आठवणीत रमले. स्नेहमेळाव्यामुळे बालपणात विखुरलेली मैत्री पुन्हा घट्ट झाली. 
एमआयडीसी परिसरातील फोर सिझन्स रिक्रिएशन या हॉटेलमध्ये स्नेहमेळावा पार 13 ऑक्‍टोबरला अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुग्धशर्करा योग साध्य झाला. शेंदुर्णी येथील न्य इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पाचवी ते अकरावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. 1966 मध्ये अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या बॅचमधील 35 विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यास हजेरी लावली होती. अर्थात एका निरागस बालपणानंतर प्रौढत्त्वात भेटणे म्हणजे अक्षरशः "प्रौढत्त्वी निज शैशवास जपणे' याचाच प्रत्यय होता. त्याकाळी एकमेकांकडे न पाहणारे, न बोलणारे विध्यार्थी आणि विद्यार्थिनी स्नेहमेळाव्या दरम्यान अगदी बहीण भावाच्या नात्याने सुख- दुःख वाटून घेतले. स्नेहमेळाव्या निमित्ताने बालपणातील आठवणी जागृत झाल्या. स्नेहमेळाव्यासाठी औरंगाबाद, नाशिक, बऱ्हाणपूर, पुणे, सिल्लोड, गंगापूर याठिकाणाहून सर्व मित्र जमले होते. यात कोणी प्राध्यापक, डॉक्‍टर, इंजिनिअर, व्यापारी, गृहिणी, शेतकरी आणि इतर क्षेत्रातील होते. 

वर्षभरापासून तयारी 
ग्रुपमधील चार मित्र वर्षभरापासून या स्नेहमेळाव्याविषयी चर्चा करत होतो. शाळा सोडून 55 वर्षे झाली आणि आम्ही सर्व सध्या सत्तरीत आहोत. त्यामुळे या भेटीची उत्सुकता शांत बसू देत नव्हती. शेवटी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस निश्‍तित झाला. यात प्रथम दिलीप अग्रवाल यांनी पुढाकार घेत व्हॅट्‌सअँप ग्रुप तयार केला. या व्हॅट्‌सअँप ग्रुपला "बचपण ते पचपन' हे नाव शांतीलाल जैन यांची नात करिष्मा लुणावत हिने सुचविले. स्नेहमेळावा आयोजित करण्यासाठी शांतीलाल जैन यांनी महत्त्वाची भुमिका बजाविली. प्रकाश पाटील, शांतीलाल जैन, विद्या भोकरे, सुरेश अग्रवाल यांनी मेळाव्याचे स्थान, स्वरूप आणि आखणी केली. स्नेहमेळाव्यात गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर चहा- नाश्‍ता देऊन सर्वजण जमले. उपस्थित असलेच्या चार भगिनींचा साडी- चोळी देऊन सत्कार करण्यात आला. अनुभव कथनात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शांतीलाल जैन, सुरेश अग्रवाल, जगन्नाथ झवर, डॉ. ओम प्रकाश अग्रवाल, प्रा. प्रकाश पाटील, भास्कर भावसार, दिलीप अग्रवाल अनुभव मांडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com