प्रचाराचे फोटो अन्‌ व्हिडिओ होताय शेअर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

जळगाव ः केवळ घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यापुरता प्रचार आता राहिलेला नाही, तर त्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार लागतोच. मुळात प्रचारासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन मानले जात असून, ते उमेदवाराला निवडून देण्यात "किंगमेकर'ची भूमिका ठरू लागले आहे. यामुळेच घरी नसलेल्या आणि सोशल मीडियावर ऑफलाइन असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याची धूम सध्या सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

जळगाव महापालिका निवडणुकीचा प्रचार आता हळूहळू जोर धरू लागला आहे. प्रत्येक कॉलन्या, उपनगरांमध्ये प्रचाराच्या रिक्षा फिरताना दिसू लागल्या असून, सकाळी साडेआठ-नऊपासूनच उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत. आगामी काही दिवसांत प्रचाराचा जोर आणखी वाढणार असून, सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर करून त्यावरील प्रचाराची गर्दी वाढणार आहे. यामुळे शहरातील प्रत्येक कॉलनी, उपनगरासह सोशल मीडियावरील चित्र जरा वेगळे पाहावयास मिळणार आहे. कारण मतदान महापालिकेचे असले, तरी प्रचारासाठी पक्षातील ज्येष्ठांचे ऑडिओ, फोटो टाकून उमेदवारांकडून एक वेगळी शक्कल लढवून प्रचार केला जात आहे. 

कॉलन्यांमध्ये रंगतेय चर्चा 
निवडणूक जशी जाहीर झाली तशी कॉलन्या, उपनगरांमध्ये त्यासंदर्भातील चर्चा रंगू लागली आहे. परंतु आता उमेदवार प्रत्यक्ष प्रचारासाठी येत असल्याने चर्चा अधिकच रंग घेऊ लागली आहे. सकाळ- सायंकाळ एका ठिकाणी एकत्र जमणाऱ्या ज्येष्ठांमध्ये सध्या केवळ निवडणुकीची चर्चा आहे. यात आपल्या भागात प्रचाराला कोण आले, सध्याचा नगरसेवक प्रचारासाठी आल्यास भागातील समस्या मांडाच, आपल्या वॉर्डात कोण निवडून येणार, याचे गणित मांडले जात आहे. यामुळे कॉलन्यांमध्येही सध्या निवडणुकीचा रंग चढलेला पाहण्यास मिळत आहे. 

"व्हॉटस्‌ऍप'वरून फोटोंचा भडिमार 
सोशल मीडियामध्ये "व्हॉटस्‌ऍप' आणि "फेसबुक' हे सर्वांत प्रभावी ठरू लागले आहेत. यांचा उमेदवारांकडून अगदी योग्य पद्धतीने वापर केला जात आहे. प्रचाराला जाणाऱ्या उमेदवारांचे फोटो आणि व्हिडिओ कार्यकर्ते मोबाईलमध्ये टिपत आहेत. नुसतेच टिपत नाही, तर ते सोशल मीडियावरून लागलीच व्हायरलही केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक नागरिकाच्या व्हॉटस्‌ऍप ग्रुपमधून फोटोंचा भडिमार सुरू आहे. इतकेच नव्हे, तर फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला जात आहे. यामुळे प्रत्यक्ष न भेटलेल्या मतदारांपर्यंत सहजपणे प्रचार पोहोचविला जात आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon social media prachar photo