जळगाव कारागृहा बाहेर दोघांवर शस्त्रांनी हल्ला ;बंदीवानास भेटायला आलेले दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉक डाऊन काळात कारागृहातील बंदीवानांची नातेवाईकांशी भेट बंद असून तरी, भेटण्यासाठी हि मंडळी जिल्हा कारागृहाबाहेर गर्दी करुन होती

जळगाव: शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मागील बाजुस कारागृहातील मित्राला भेटायला आले असतांना स्वीफ्ट कार मधुन आलेल्या चौघांनी दोन तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना चार वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरुणांना उपचारार्थ डॉ.उल्हास पाटिल रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. 

जळगाव शहरातील कारागृहात बंदीवासात असल्याने फौजी ऊर्फ सनी बालकिशन जाधव (वय-22 रा. रामेश्‍वर कॉलनी मेहरुण),रणजीत इंगळे (वय-29,रा.जैनाबाद) असे दोघेही आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी कारागृहाच्या बाहेरील धान्य गोदामाजवळ उभे होते. पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कार मधुन आलेले चौघेही कारागृहात भेटण्यासाठीच आले होते. मात्र, त्यांचा फौजी आणि रणजीत इंगळे यांच्याशी वाद होवून चौघांनी धारदार शस्त्रांनी दोघांवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त कळताच जिल्हापेठ पोलिसांनी धाव घेतली. जखमींना तत्काळ डॉ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, खुर्द येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले असून जखमींच्या जबाबानंतर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात येणार असल्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी सांगीतले. 

जेल भेट बंदच 
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉक डाऊन काळात कारागृहातील बंदीवानांची नातेवाईकांशी भेट बंद असून तरी, भेटण्यासाठी हि मंडळी जिल्हा कारागृहाबाहेर गर्दी करुन होती. दुपारी चार वाजता धान्य गोदामा जवळ उभे असतांना कारमधील चौघांशी वाद होवुन हाणामारी झाल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sub-jail ariya attacked Two yong boys injuard