उष्माघाताने दोन तरुणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

जळगाव ः जिल्ह्यात उष्णतेची लाट असून दिवसेंदिवस पारा वाढत आहे. आज भुसावळ तालुक्‍यातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात भुसावळ मधील आनंद लॉन्स येथे मित्राच्या लग्नासाठी पुण्यावरून आलेल्या भुसावळ तालुक्‍यातील साकरी येथील तरुण चक्कर येऊन पडला. तर खडकी येथे गुरुवारी चक्कर येऊन पडलेल्या तरुणाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू 
झाल्याची घटना घडली. दरम्यान हे दोन्ही तरुण उष्माघाताचे बळी ठरल्याची चर्चा आहे. 

साकरी (ता. भुसावळ) येथील अभय शरद फेगडे (वय 27) हा तरुण पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान अभयच्या मित्राचे लग्न असल्याने पुणे येथून भुसावळला आला होता. विवाह ठिकाणी आनंद लॉन्समध्ये अभयला दुपारी दोन वाजता अचानक चक्कर आल्याने तो जमिनीवर पडला. मित्रांनी त्यास तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अभय याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासले असता अभयला मृत घोषित केले. त्याच्या पश्‍चात आई-वडील, मोठा भाऊ, भावजयी, दोन बहिणी असा परिवार आहे. 

खडकीच्या तरुणाचा मृत्यू 
दुसऱ्या खडकी (ता. भुसावळ) येथील लक्ष्मण छगन बारेला (वय 25) हा गावात नातेवाईंकडून घरी येताना गुरुवारी (ता. 3) सायंकाळी साडेपाचला चक्‍कर येऊन पडल्याची घटना घडली होती. नातेवाइकांनी त्यास तातडीने खासगी रुग्णालय नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान लक्ष्मणचा आज सकाळी साडे आठ वाजता वाजता मृत्यू झाला. 
 
उष्माघाताने दोघा तरुणांचा मृत्यू झाला का हे सांगणे अजून कठीण आहे. अन्य कारणांनी देखील मृत्यू होऊ शकतो. दोघा तरुणांचा व्हिसेरा नाशिक येथे लॅब पाठविला आहे. रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे मूळ कारण निष्पन्न होईल. 
-डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: marathi news jalgaon sunstroke