Loksabha 2019 : पक्षातील मंडळींचे "षड्‌यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील

Loksabha 2019 : पक्षातील मंडळींचे "षड्‌यंत्र'; आपल्याविरुद्ध रचला डाव : ए. टी. पाटील

पारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्‌यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगळवारी (ता. 26) मेळाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे खासदार ए. टी. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी एस पाटील, माजी नगराध्यक्ष बजरंग अग्रवाल, जिल्हा चिटणीस सुरेंद्र बोहरा, जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, तालुकाध्यक्ष ऍड. अतुल मोरे, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, धीरज महाजन, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रवीण दाणेज, अजित मन्सुरी, गोपाल अग्रवाल, भावडू राजपूत, समीर वैद्य यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
खासदार पाटील म्हणाले, की दहा वर्षे लोकसभेत प्रतिनिधित्व करून संसदेतील आपला कामाचा अहवाल चांगला आहे. त्यामुळे आपल्यालाच पक्षश्रेष्ठी उमेदवारी घोषित करतील, असा पूर्ण विश्वास होता. मात्र, पक्षाने आपली उमेदवारी नाकारल्याने मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ते नाराज झाले. काहींना रडू कोसळले. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगळवार सायंकाळी बालाजी मंदिर येथे मेळावा होणार आहे. त्यांच्याशी हितगूज करून मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करू. गेल्या दहा वर्षांपासून पक्षाचा एकनिष्ठ पाईक म्हणून काम केले. मतदारसंघातील उपेक्षित कामांना प्राधान्य देण्याची भूमिका वेळोवेळी घेतली. मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नाबरोबर पक्षातील कार्यकर्त्यांत पक्षसंघटन वाढीस लावली. मात्र, काही मंडळींनी आपल्या विरोधात षड्‌यंत्र रचून डाव साधण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर अन्याय झाला असून, कार्यकर्त्यांशी हितगूज करून मेळाव्यात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
वरिष्ठांकडे म्हणणे मांडणार : सुरेंद्र बोहरा 
आमच्या नेत्यावर अन्याय झाला असून, वरिष्ठांकडे बाजू मांडू. पुन्हा संधी देण्याची मागणी वरिष्ठांकडे आम्ही पदाधिकारी करणार आहोत. ए. टी. पाटलांचे कार्य हे संघटनात्मक विकासाभिमुख होते. त्यांच्यावर निश्‍चितच अन्याय झाला आहे, असे सुरेंद्र बोहरा यांनी सांगितले. 

पक्षाने दखल घ्यावी : ऍड. अतुल मोरे 
आमचे मार्गदर्शक ए. टी. पाटील यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाला आहे. आम्ही कार्यकर्ते त्यांच्या बाजूने वरिष्ठांकडे मागणी करू. महाराष्ट्र संघटनमंत्री विजय पुराणिक यांची भेट घेऊन ए. टी. पाटील यांच्याबाबत पक्षाने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती करणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com