तहसील कार्यालयात पुरवठा अधिकाऱ्याला शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

जळगाव : शहरातील तहसीलदार कार्यालयात आज दुपारी बाराला एका ग्रामस्थाने दारूच्या नशेत पुरवठा अधिकाऱ्यांना यथेच्छ शिवीगाळ करून संताप व्यक्त केला. तीन वर्षांपासून कानसवाडे, सुजदे आणि धामणगाव येथील रेशन दुकान बंद करून बेरोजगार केल्याचा संताप या ग्रामस्थाने अधिकाऱ्यांना तोंडावर शिवीगाळ करीत व्यक्त केला. तहसीलदार अमोल निकम यांनी त्याला मुस्काट्यात लगावल्यावर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

जळगाव : शहरातील तहसीलदार कार्यालयात आज दुपारी बाराला एका ग्रामस्थाने दारूच्या नशेत पुरवठा अधिकाऱ्यांना यथेच्छ शिवीगाळ करून संताप व्यक्त केला. तीन वर्षांपासून कानसवाडे, सुजदे आणि धामणगाव येथील रेशन दुकान बंद करून बेरोजगार केल्याचा संताप या ग्रामस्थाने अधिकाऱ्यांना तोंडावर शिवीगाळ करीत व्यक्त केला. तहसीलदार अमोल निकम यांनी त्याला मुस्काट्यात लगावल्यावर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 
जळगाव तालुक्‍यातील कानसवाडे येथील रहिवासी ज्ञानदेव गंगाराम सोनवणे (वय 39) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस ठाण्यात आणून बसवले आहे. तहसील कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या शिपायाने तक्रार देण्यास नकार दिल्याने त्याच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा मात्र दाखल झालेला नव्हता. प्राप्त माहितीनुसार आणि ज्ञानदेव याची चौकशी केल्यावर त्याने सत्यस्थिती मांडली. त्याच्याकडे ग्रामीण भागातील पाच रेशन दुकानांची जबाबदारी होती, त्यापैकी दोन अगोदरच बंद झाले असल्याने कानसवाडे, सुजदे आणि धामणगाव या तीन ठिकाणावर दुकानांतून ग्रामस्थांना रेशन वाटप सुरू होते. 

तीन वर्षांपासून दुकान बंद 
मात्र जून-2015 मध्ये तक्रारीनंतर तहसील विभागातर्फे दुकानांची पाहणी करण्यात येऊन फोनवरून तोंडी आदेश देत दुकान बंद करण्यात आले. थोड्या दिवसांत चौकशी पूर्ण होऊन पुन्हा सुरू होईल म्हणून मी, शांत राहिलो. मात्र बघता बघता तीन वर्षे निघून गेले रेशन दुकान काही सुरू झाले नाही. पुरवठा विभागात सतत पाठपुरावा करीत असताना अधिकाऱ्यांतर्फे आश्‍वासन दिले जात होते. अखेर काही दिवसांपूर्वी रेशन दुकानाचा परवानाही रद्द करण्यात आला. त्याची विचारपूस केल्यावर "वरूनच' बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, ठोस कारण दिले जात नाही. मुलाच्या नावे परवाना मिळवून दुकान सुरू करून देऊ, असेही त्यावेळी सांगण्यात आले. मात्र तशाही काहीच हालचाली दिसत नसल्याने आज तहसील कार्यालयात आलो होते तेव्हा वाद झाल्याचे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोनवणे याने सांगितले. 

तक्रार देण्यास कुणी येईना 
ज्ञानदेव सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर, शासकीय कामात हस्तक्षेप, शिवीगाळसंबंधी पुरवठा अधिकारी दीपक कुसकर तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात आलेच नाही. जो शिपाई कार्यालयातर्फे पाठविण्यात आला होता, त्यानेही माझ्याशी त्याचा काही वादच झालेला नसल्याने "मी कशी तक्रार देऊ' असे सांगितल्यावर पोलिसांनी पुन्हा तहसील कार्यालयाशी संपर्क तक्रार देण्यास सांगण्यात आले. तेव्हा मात्र संबंधितांनी तक्रार देत नसल्याचे कळविले. संबंधित ठाणे अंमलदाराने "चॅप्टर केस' भरून तुमच्याकडेच पाठवतो असे विचारल्यावर त्यासही तहसील कार्यालयाने नकार देत "तिकडेच काहीतरी करा..' असे सांगितले. 

घडल्या प्रकारात केवळ गोंधळ झाला होता. संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला तक्रार देण्यास पाठविले आहे, शिवीगाळ वगैरे झाल्याचे माहीत नाही, तरी माहिती घेऊन कळवितो. 
अमोल निकम, तहसीलदार

Web Title: marathi news jalgaon tahshil office