तलाठ्यांवरील हल्ल्याप्रकरणी चौघांना सश्रम कारावास 

तलाठ्यांवरील हल्ल्याप्रकरणी चौघांना सश्रम कारावास 

जळगाव : तलाठ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर नेल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आज नगरसेवक पुत्रासह चौघांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात 13 साक्षीदारांच्या महत्त्वपूर्ण साक्ष होऊन संशयितावरील गुन्हा सिद्ध झाल्याने मुख्य दोन संशयितांना 7 वर्षे सश्रम कारावास आणि उर्वरित दोघांना 2 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. 
घनश्‍याम पाटील आणि अनिल सुरवाडे असे दोघे तलाठी 13 नोव्हेंबर 2013 ला कर्तव्यावर असताना तालुक्‍यातील वैजनाथ शिवारात नऊच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर उत्खनन करून चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्‍टर येताना दिसले. दोघा तलाठ्यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, ट्रॅक्‍टरचालकांनी वाहन न थांबवता मागील ट्रॅक्‍टरचालक आणि नगरसेवक पुत्र दीपकच्या चिथावणीवरून रमेश काशिनाथ सोनवणे, गुलाब बाबूलाल मोरे यांनी विनाक्रमांकाचे ट्रॅक्‍टर सुसाट चालवून तलाठ्यांच्या अंगावर नेले. यात अनिल सुरवाडे यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी सुरवाडे यांच्या तक्रारीवरून रमेश काशिनाथ सोनवणे, गुलाब बाबूलाल मोरे, दीपक संतोष पाटील, रवींद्र विक्रम हटकर यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

13 जणांच्या साक्ष 
पोलिस निरीक्षक एम. जी. बनकर, विपिन शेवाळे यांनी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यावर न्या. गोविंदा सानप यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सरकारपक्षातर्फे एकूण 13 साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात येऊन प्राप्त पुराव्यांवरून संशयितांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आज न्यायालयाने तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्‍टर नेणाऱ्या रमेश काशिनाथ सोनवणे व गुलाब बाबूलाल मोरे यांना 7 वर्षांचा सश्रम कारावास आणि दंड, तर दीपक संतोष पाटील, रवींद्र विक्रम हटकर अशा दोघांना 2 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे ऍड. प्रदीप महाजन, ऍड. अनुराधा वाणी यांनी कामकाज पाहिले. त्यांना विजय चौधरी यांनी सहकार्य केले. 

अशी कलमे, अशी शिक्षा 
- रमेश सोनवणे, गुलाब मोरे दोघांना (प्राणघातक हल्ला कलम- 307,34 अन्वये) 7 वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी 15 हजार दंड, दंड भरल्यास 6 महिने साधी कैद, (कलम-333,34 अन्वये) 2 वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी 7 हजार रुपये दंड दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, (कलम-338, 34 अन्वये) 1 वर्षाचा सश्रम कारावास, प्रत्येकी 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने कैद, (कलम-354 अन्वये) 1 वर्ष साधी कैद, प्रत्येकी 2 हजार दंड, दंड न भरल्यास 2 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. 
- रमेश सोनवणे, गुलाब मोरे, दीपक पाटील, रवींद्र हटकर यांना विनापरवाना चोरटी वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी (कलम-379 अन्वये) 2 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 25 हजार रुपये दंड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com