तापीचे पाणी आटले, विहिरी- कूपनलिका 40 फुटांनी खोल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

रावेर : तापी नदीपात्रातील पाणी यंदा नेहमीपेक्षा लवकर आटल्याने तालुक्‍याच्या पूर्वेकडील गावांतील विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी घसरली आहे. अजून पावसाळा दोन महिने लांब असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. 

तापी नदी तालुक्‍याच्या दक्षिण दिशेने वाहते. तालुक्‍यातील अजनाड, दोधा, नेहता, अटवाडे, धुरखेडा, ऐनपूर, थेरोळा, निंभोरासीम, सुलवाडी, कोळदा आदी गावातून वाहते. नदीपात्रात खालच्या बाजूस असलेल्या हतनूर प्रकल्पामुळे उन्हाळ्यात देखील नदीपात्रात पाणी राहते. यामुळे परिसरातील कूपनलिका आणि विहिरींना भरपूर पाणी असते. यावर्षी मात्र हतनूर प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने दोधा, नेहता, अटवाडा आदी गावांजवळील पाणी आटले आहे. नदीपात्र उघडे पडले असून केवळ वाळू दिसत आहे. यामुळे या तिन्ही गावांच्या परिसरातील कूपनलिका आणि विहिरींचे पाणी खोल गेले आहे. मागील वर्षीपेक्षा किमान 40 फुटांनी जलपातळी घसरली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: marathi news jalgaon tapi river

टॅग्स