तापी नदी खोऱ्यातील जमिनीचे फैजपूरला हवाई सर्वेक्षण सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

फैजपूर/रावेर : मेगा रिचार्ज योजनेंतर्गत तापी नदीच्या खोऱ्यातील जमिनीचे हवाई सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून करण्याची प्राथमिक सुरवात आज फैजपूरला करण्यात आली. तापी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत जगातील सर्वांत प्रगत "लायडर' (liDAR) या तंत्रज्ञानाचा वापर करून उद्या (13 ऑगस्ट) या सर्वेक्षणाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. 

फैजपूर/रावेर : मेगा रिचार्ज योजनेंतर्गत तापी नदीच्या खोऱ्यातील जमिनीचे हवाई सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून करण्याची प्राथमिक सुरवात आज फैजपूरला करण्यात आली. तापी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत जगातील सर्वांत प्रगत "लायडर' (liDAR) या तंत्रज्ञानाचा वापर करून उद्या (13 ऑगस्ट) या सर्वेक्षणाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. 
फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाच्या मैदानावर या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. फैजपूरशिवाय चोपडा, बऱ्हाणपूर, शहापूर, नेपानगर या ठिकाणी हेलिपॅड तयार केले आहेत. आगामी दहा दिवसांत या ठिकाणाहून उड्डाण करून हवाई सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हेलिकॉप्टरला "लायडर' ही अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा बसविण्यात आली आहे. याच्या सहाय्याने सातपुड्याच्या पर्वतरांगांची काठा-काठाने छायाचित्रे घेण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणासाठी केंद्रीय संरक्षण खात्याने यापूर्वीच परवानगी दिली आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यांत प्रकल्पाला मंजुरी आणि निधी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे सुमारे पाच लाख हेक्‍टर जमिनीला लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. 
मेगा रिचार्ज योजनेंतर्गत महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील महाकालवा पुनर्भरण योजना प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी तापी नदीच्या पुराचे पाणी कालव्यामार्गे वळवून महाराष्ट्र, मध्य प्रदेश सातपुड्याच्या पायथ्याशी उजवा कालवा 220 केव्ही व डावा कालवा 280 केएम याद्वारे संपूर्ण नदी-नाल्याचे पुराचे पाणी सोडून जमिनीत पाणी जिरवण्याची भूजल पातळी वाढविणे या प्रकल्पाचे मुख्ये उद्देश आहे. उजवा कालव्याच्या माध्यमातून सातपुड्याच्या पायथ्याशी अनेर नदी बुऱ्हाणपूर, नेपानगर, धारणी, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर भागातील जमिनीला त्याचा फायदा होणार असून डावा कालव्यामधून अकोट, अचलपूर, अंजनगाव सुरजी, जळगांव जामोद व विदर्भाचा काही भागास असे या दोन्ही कालव्यांच्या माध्यमातून जवळपास पावणे चार लाख हेक्‍टर जमिनीची भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. या पार्श्‍वभूमीवर फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात आज दुपारी एकला Geokno इंडिया प्रा. लिमिटेड (हैदराबाद) या कंपनीच्या तज्ञाकडून दुपारी सर्वात प्रगत "लायडर' या तंत्रज्ञानाचा वापर करून या सर्वेक्षणाची प्राथमिक सुरवात करण्यात आली आहे. मात्र हवामानामुळे आज हे सर्वेक्षण स्थगित करण्यात आले. तापी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या समेत जगातील सर्वांत प्रगत "लायडर' या तंत्रज्ञानाचा वापर करून उद्या (13 ऑगस्ट) या सर्वेक्षणाला प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. 
आज धनाजी नाना महाविद्यालय प्रांगणावर सर्वेक्षणप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, तापी खोरे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी अभियंता व्ही. डी. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील उपस्थित होते. 

Web Title: marathi news jalgaon tapi river sarvey