मार्चमध्येच "मे हीट'चा तडाखा; जळगावचा पारा चाळीशीवर

मार्चमध्येच "मे हीट'चा तडाखा; जळगावचा पारा चाळीशीवर

जळगाव ः आठवडाभरापासून जळगावचे तापमान वाढतच होते. जळगाव परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने साधारण आठवडाभरापासून तापमान 38 अंशांवर स्थिरावलेले होते. परंतु आज 40 अंशांचा पारा गाठला आहे. आगामी आठवडाभरात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. 
दरवर्षी उन्हाळ्यात उच्चांकी तापमानात जळगाव आघाडीवर असते. तो विशेषतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरवात होऊन संपूर्ण मेमध्ये तीव्रता अधिक असते. यंदा मात्र आतापर्यंत रात्री जाणवत असल्यानंतर "मार्च हीट'चा तडाखा दिला आहे. साधारण एप्रिलपासून चाळीशी पार करणाऱ्या तापमानाने मार्चअखेरच चाळीशी ओलांडण्यास सुरवात केली आहे. यंदाच्या तापमानाने आज उंची गाठत 40.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्याचा परिणाम दुपारी शहरातील रस्ते काहीसे निर्मनुष्य झालेले पाहण्यास मिळाले. 

झळांमुळे वर्दळीवर परिणाम 
दोन दिवसांपासून तापमानासोबतच उकाड्यातही वाढ झाल्याचे जाणवत आहे. सकाळी अकरापासूनच तीव्र उष्मा जाणवू लागल्याने रस्त्यांवरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. दुपारी एक-दीडनंतर तर सावलीत उभे राहिल्यानंतरही उष्णतेच्या झळा असह्य होत आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून, झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मार्चच्या सुरवातीला थंडीनंतर तापमानात दिवसागणिक वाढ होत असल्याने आतापासूनच "मे हीट'चा अनुभव जळगावकरांना येऊ लागला आहे. 


तापमान वाढ ही दरवर्षीच्या उन्हाळ्याप्रमाणे होत असून, पावसाळा कमी झाल्यामुळे तापमानाची तीव्रता अधिक आणि लवकर जाणवू लागली आहे. 
- डॉ. एस. टी. इंगळे, संचालक, पर्यावरण आणि भूगर्भशास्त्र प्रशाळा (उमवि) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com