उन्हाची तीव्रता वाढतीच; पारा 44 अंशावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

ळगावः गेल्या तीन- चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत जात आहे. आठवडाभरापूर्वी कमी झालेल्या तापमानाने आज 44 अंश सेल्सिअस गाठले. कालच्या तुलनेत तापमानात दोन अंशांनी वाढ झाली आहे. जळगावकर एप्रिलच्या सुरवातीपासूनच वाढत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत. यात आणखी वाढ झाल्याने उष्णतेच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. 

गेल्या आठवड्यात पाच अंशांनी घसरलेला पारा पुन्हा वाढला आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढली असून, आज शहरातील कमाल तापमान 44 अंशांवर पोचल्याने जनजीवन विस्कळित झाले आहेत. मार्चअखेर पाऱ्याने चाळिशी पार केली. त्यानंतर तापमानात दिवसेंदिवस वाढच होत राहिली. दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र उकाडा कायम होता. आता पुन्हा तापमानात वाढ होऊन पारा 44 अंशांवर पोहचला आहे. तीव्र उन्हाच्या झळांनी आता दुपारच्या वेळी घराच्या बाहेर निघणे देखील असह्य होऊ लागले आहे. 

उन्हाच्या तीव्र झळा 
तीन दिवसांपासून तापमानाची तीव्रता अधिक वाढल्याचे जाणवत आहे. तापमान यंदा प्रथमच 44 अंशावर आले असून, आज सकाळी दहापासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. या झळा सायंकाळपर्यंत कायम राहत आहेत. उन्हाच्या झळांमुळे जळगावकर आपले काम सकाळी आणि सायंकाळी सहानंतर करणे पसंत करत आहे. दुपारच्यावेळी मार्केटमध्ये येण्याचे शक्‍यतो टाळले जात असल्याने रस्त्यांवरची वर्दळ देखील कमी झालेली पाहण्यास मिळत आहे. 

दोन दिवस उष्णतेची लाट 
यंदाचे उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, पुढच्या दोन- तीन दिवसात पारा आणखी वर चढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्‍यता आहे. 

आठवड्यातील तापमान 
तारीख............कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
19 एप्रिल.........39 
20 एप्रिल.........40.2 
21 एप्रिल.........40.8 
22 एप्रिल.........41.8 
23 एप्रिल........42.8 
24 एप्रिल........42.2 
25 एप्रिल........44 

Web Title: marathi news jalgaon tempreture 44 digree