जळगावचा पारा @45 अंशावर ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

जळगाव ः उन्हाची तीव्रता वाढत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. मध्यंतरी 24 मेस एका अंशाने खाली घसरलेला पारा पुन्हा वर सरकून आठ दिवसांपासून शहरातील तापमान 43 अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. आज मात्र शहराचा पारा दोन अंशाने वाढून 45 अंशावर पोहचला आहे. पुढील दोन दिवसांत आणखी तापमानाचा पारा वाढण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे. 

आठवडाभरापासून जळगावकरांना "मे हीट'चा तडाखा जाणवत आहे. तसेच विदर्भात उष्णतेची लाट असून चंद्रपूरचा तापमानाचा पारा 48 अंशावर गेल्याने खानदेशात याचा परिणाम दिसू लागला आहे. शहराचा चार दिवसांपासून असलेले 43 अंशांवरील तापमान आज वाढलेले असून पारा 45 अंशावर गेला आहे. यामुळे उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत. दुपारी बारानंतर याची तीव्रता अधिक जाणवत असल्याने रस्ते निर्मनुष्य झालेले पाहावयास मिळाले. 

वऱ्हाडी मंडळीचे हाल 
गेल्या तीन- चार दिवसांपासून लग्नतिथी मोठी असल्याने शहरात अनेक ठिकाणी लग्नसमारंभ सुरू आहे. परंतु पारा वाढल्याने वऱ्हाडी मंडळींना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 
 
उकाड्याने नागरिक हैराण 
तीन- चार दिवसांपासून तापमान 43 अंश तसेच 43. 6 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत असून गरम हवा असल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे नागरिक दुपारी घराबाहेर जाणे टाळत आहे. त्यामुळे जळगावकर पूर्णतः हैराण झाले आहेत. यामुळे कधी एकदाचा उन्हाळा संपतोय आणि पावसाळा सुरू होतो या प्रतीक्षेत जळगावकर आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tempreture 45 digree