वाढत्या तापमानामुळे करपल्या केळीबागा 

संतोष पाटील
सोमवार, 27 मे 2019

भोकर (ता. जळगाव), ता. 26 ः मार्च, एप्रिलमध्ये लागवड केलेल्या तापी नदीपट्ट्यातील केळीबागांना पाणीटंचाई जाणवत असून, निसवण झाडे व चालू स्थितीत असलेली लहान झाडे करपली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने शेतकऱ्यांना भरपाईचा दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

जिल्ह्यात सध्या तापमान खूप वाढले आहे. तब्बल 44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले. याशिवाय गिरणा परिसरपाठोपाठ तापी परिसरातील कूपनलिकांनी तळ गाठला आहे. जळगाव तालुक्‍यातील कंरज, सावखेडा, किनोद, कठोरा, भादली, गाढोदा, नंदगाव, फेसर्डी, पळसोद, जामोद, आमोदा, गोरगावले, खेडीभोकर कोळंबा, संपुले या परिसरातील केळीबागा वाढत्या तापमानामुळे करपल्या आहेत. 
तापमान वाढल्यामुळे केळीचे घड पक्व होण्याअगोदरच अतिउष्णतेमुळे निसटून किंवा अर्धवट मोडून पडत आहेत. कूपनलिकांनी तळ गाठल्यामुळे केळी पिकासाठी लागलेला खर्च निघणे जिकिरीचे बनले आहे. यासंदर्भात सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई कृषी विभागाने करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

कपाशी लागवडीलाही फटका 
मे व जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड चांगल्या प्रमाणात करण्यात येत होती. पंरतु यावर्षी अजूनही उन्हाची तीव्रता कमी न झाल्याने व पाणीटंचाई असल्याने कमी प्रमाणात कपाशी लागवड केली जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tempreture banana