coronavirus : खबरदार..."कोरोना'ची अफवा पसरावाल..तर खावी लागणार जेलची हवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

सोशल मिडीयावर कोरोना'बाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर "सायबर सेल'मार्फत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज दिल्या आहेत.

जळगाव :आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे. संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने त्यावर नियंत्रणासाठी विविध विभागांना दक्षतेचे आदेश दिले आहे. सोशल मिडीयावर कोरोना'बाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर "सायबर सेल'मार्फत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज दिल्या आहेत. सोबतच महापालिका, पालिका, महसूल विभाग, आरोग्य विभागांनाही योग्य त्या उपाय योजना तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

आर्वजून पहा : आला वारा... उलटली बोट.. अन्‌ 15 जण बुडाले; उच्छल येथील दुर्घटना 

पोलिसांना दिलेल्या सूचना 
पोलिस विभागाने कोरोनो'बाबत अफवा पसरविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यवाहीच्या सूचना दिल्या. परदेशी नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेल्या भारतीय नागरिकांनांची माहिती ठेवणे, सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांना रद्द करण्यास सांगणे. जिल्हा रुग्णालयाची समन्वय ठेवणे. 

खासगी रुग्णालये अधिग्रहीत होणार 

आरोग्य विभागाचे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लघू कृती प्रमाणित कार्य पध्दती तयार करावी, कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी उपाय योजावेत. स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवावी, संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र ऍब्यूलन्सची व्यवस्था करावी. कोरोना विषाणू संसर्गाची माहिती स्वतंत्र जिल्हा नियंत्रण कक्ष व मदत केंद्राची स्थापन करावेत, चोवीस तास हे कक्ष सुरू ठेवावेत. विमानाने येणाऱ्या प्रवासी रुग्णांचा शोध घेऊन त्याला नियंत्रणाखाली ठेवावे. खासगी डॉक्‍टरांची सेवा अधिग्रहीत करावी, हॉस्पिटल व साधनसामग्री अधिगृहीत करावी. 

क्‍लिक कराः "कोरोनाचा'  चिकन खवय्यांनी घेतली धास्ती...पोल्ट्री व्यवसायावर ‘कोरोना’चे संकट 
 

महापालिका/पालिका 
महापालिका, पालिकांनी वॉर्डात स्वच्छता ठेवावी, केरकचरा साचणार नाही याची काळजी घ्यावी. औषध विक्रेत्यांनी जास्त दराने मास्कची विक्री करू नये, साठेबाजी करू नये यावर लक्ष ठेवावे, स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करावीत, मदत केंद्रे, माहिती केंद्रे चोवीस तास सुरू ठेवावी, स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा. 

 
जिल्हा परिषद 
जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्रातर्फे जनजागृती करावी, 
मदतीसाठी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष (020-26127394) व राष्ट्रीय कॉल सेंटर 91-11-23978046 याक्रमांकावर संपर्क साधण्यास सांगावे. स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून ठेवावी, अंगणवाडी, शाळांमध्ये प्रबोधन करावे. 

महसूल विभाग 
सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी आपल्या स्तरावर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करावी, विविध संस्था, संघटना व व्यक्तींकडून परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती जिल्हा रुग्णालयास कळवावी. 
 

क्‍लिक कराः "कोरोनाचा'  चिकन खवय्यांनी घेतली धास्ती...पोल्ट्री व्यवसायावर ‘कोरोना’चे संकट 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Those who spread rumors about Corona 'will be charged