"थ्रेशर'मध्ये पाय अडकून तरुणाचा मृत्यू 

"थ्रेशर'मध्ये पाय अडकून तरुणाचा मृत्यू 

ळगाव ः शेळगाव (ता. जळगाव) येथील विजय राजाराम कोळी (वय 36) याचा शेतात उडीद, मूग काढणीच्या थ्रेशर मशिनमध्ये पाय ओढला गेल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अडीचशे रुपये रोजंदारीवर विजय थ्रेशर मशिनवर काम करीत होते. उजव्या पायाचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत विजय यांना सहकाऱ्यांनी काढून जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तपासणीअंती त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. 
विजय कोळी हे पत्नी सरलासमवेत शेतातील मिळेल ते काम करून दोन अपत्ये, आई-वडिलांचा उदनिर्वाह चालवत. पितृपंधरवड्यातील ऊन आता तापू लागल्याने शेतातील कडधान्य काढणीच्या कामास वेग आला आहे. आज सकाळी शेळगाव शेतशिवारातील भूषण दिलीप पाटील यांच्या शेतात हडंबा (थ्रेशर) मशिनद्वारे उडीद, मूग काढणीते काम सुरू होते. विजय अडीचशे रुपये रोजंदारीने या मशिनवर बसून पेंढ्या टाकत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा उजवा पाय मशिनच्या तोंडावर पडला अन्‌ काही कळण्याआधीच तो कमरेपर्यंत यंत्रात ओढला गेला. त्यात प्रचंड रक्तस्त्रावामुळे विजय यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी त्यांच्यासमवेत काम करणारे रवींद्र कोळी, रामचंद्र कोळी, पंकज कोळी यांनी धाव घेत मशिनमधून त्यांना ओढून काढत गावातील मारुती ओमनी कारमधून जळगाव जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले. तेथे ड्युटीवर असलेले पोलिस नाईक अनिल फेगडे यांनी पंचनामा केल्यावर विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आला. यासंदर्भात नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

"सिव्हिल'मध्ये पत्नीचा आक्रोश 
विजय यांच्यामागे पत्नी सरला, मुलगा ओम (वय 8), मुलगी प्रांजल (वय 12), आई-वडील, दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. विजय यांच्यासमवेत सकाळी पत्नी सरलाही कामाला गेल्या होत्या. विजय उडीद, मूग काढणीसाठी थ्रेशर मशिनवर काम करीत होते, तर शेजारच्या शेतात सरला काम करीत होत्या. घटना घडल्यावर जखमी विजय यांना जिल्हा रुग्णालयात आणल्यावर त्याही तत्काळ तेथे पोहोचल्या. विजय यांच्या मृत्यूचे वृत्त सहन होणार नाही म्हणून त्यांना फक्त पायाला लागल्याचे सांगण्यात आले. मात्र, पतीला भेटू द्या म्हणून हट्टाला पेटलेल्या सरला यांना विपरीत घडल्याची शंका आल्याने जोरदार हंबरडा फोडत आक्रोश केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com