नदी पात्रात मृतावस्थेत आढळला पट्टेदार वाघ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

जळगाव ः मुक्ताईनगर तालुक्‍यातील थेरोळा गावालगत असलेल्या पूर्णा नदी पात्रात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. वडोदा वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघ मृत होण्याची पाचवी घटना असून गेल्या पाच महिन्यातील दुसरी घटना आहे. 

पट्टेदार वाघ नदी पात्रात मृतावस्थेत असल्याचे आज सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आले. आजच्या घटनेत कुऱ्हा गावालगतच्या थेरोळा गावाच्या गावठाणापासून दोन किमी अंतरावर शेतशिवारलगत पूर्णा नदीपात्रात पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला. परंतू या वाघाला ठिबकच्या नळ्यांनी बांधले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नदीकाठावर लागलेल्या वाघाची मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. वाघाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की घातपाताने याबाबत संशय निर्माण केला जात आहे. वडोदा वनपरिक्षेत्राधिकारी अमोल चव्हाण व सहकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. तूर्त घटनास्थळ निर्मनुष्य करण्यात आल्या असून जिल्हास्तरावरून वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्यानंतर मृत वाघाला पाण्याबाहेर काढण्यात येणार आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon tiger daith river water