जि. प. अध्यक्षांनीच पकडला टोळी ग्रा. पं.तील जुगारअड्डा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी जिल्ह्यात अचानक पाहणी करण्याचा धडका सुरू केला आहे. आज त्यांनी पारोळा तालुक्‍यातील टोळी ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. तेथे कार्यालयात चक्क जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पाटील गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात अचानक भेटी देऊन तेथील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणीपुरवठा, तसेच ग्रामपंचायत कार्यालयांची पाहणी करीत आहेत. आज पारोळा तालुक्‍यात पाहणी करीत असताना टोळी येथील ग्रामपंचायत कार्यालयास त्यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात चक्क पत्त्याचा खेळ सुरू असल्याचे दिसून आले. अध्यक्षांना पाहताच खेळणारे पळू लागले. त्यावेळी त्यांचे छायाचित्र काढण्यात आले व व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. यावेळी त्यांनी यासंदर्भात ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon todi grampanchayat jugar adda