शौचालयाचे अनुदान लाटणाऱ्या 91 जणांवर गुन्हे दाखल करणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जळगाव ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनातर्फे 12 हजार तर महापालिकेतर्फे 5 हजाराचे अनुदान दिले जात आहे. 8 हजार 626 लाभार्थ्यांपैकी 
1 हजार 136 लाभार्थ्यांनी अद्यापही बांधकाम सुरू केले नाही. तर बांधकाम न करणाऱ्या 91 लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रशासनातर्फे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 8 हजार 626 प्राप्त झाले. त्यानुसार पहिला सहा हजाराचा हप्ता तर दुसरा 11 हजाराचा हप्ता अदा करण्यात आला. पहिल्या हप्त्यापोटी 6 हजार रुपये प्रमाणे 8 हजार 626 लाभार्थ्यांना 5 कोटी 17 लाख 56 हजार तर दुसरा हप्ता 11 हजार प्रमाणे 6 हजार 125 लाभार्थ्यांना 6 कोटी 65 लाख 40 हजार ऐवढी रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यातून आतापर्यंत 6 हजार 246 लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. 

102 लाभार्थ्यांनी रक्कम परत केली 
वैयक्तिक शौचालयाची बांधकाम करण्यासाठी 8 हजार 626 लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता अदा केले आहे. आतापर्यंत 6 हजार 246 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, 1 हजार 198 शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. तर 1 हजार 136 लाभार्थ्यांनी अद्यापही बांधकाम सुरू केलेले नाही. बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत 91 लाभार्थ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तर कारवाई टाळण्यासाठी 102 लाभार्थ्यांनी प्रशासनाकडून घेतलेल्या अनुदानाची रक्कम परत केली आहे. 

Web Title: marathi news jalgaon toilet 91 froad