विद्युत तार तुटून पडल्याने तिन ट्रॅव्हल्स्‌ जळून खाक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

जळगाव ः शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दुरदर्शन टॉवरजवळील मोकळ्या मैदानावर उभ्या असलेल्या ट्रॅव्हलवर विद्युत तार तुटून पडल्याने लागलेल्या आगीत तीन ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत. ट्रॅव्हल्समध्ये कोणी नसल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. 

जळगाव शहरातून गेलेल्या मुंबई- नागपूर महामार्गालगत जळगावहून भुसावळकडे जाताना तीन किलोमीटर अंतरावरील दुरदर्शन टॉवरसमोर गॅरेज आहे. महामार्गाला समांतर विद्युत लाईन गेलेली आहे. गॅरेजजवळ रांगेत उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स आज दुपारी विद्युत तारमध्ये स्पार्किंग होवून तार तुटून बसवर पडली. यात झालेल्या स्पार्किंगमुळे बसच्या सिटने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रूद्र रूप घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या अन्य दोन बस देखील यात जळाल्या. आगीमुळे टायरचा स्फोट देखील झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली. मात्र जास्त गर्दी नसल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला सदर माहिती कळविण्यात आले. पाण्याचे बंब पोहचेपर्यंत तीन बसचा कोळसा झाला होता. या प्रकारामुळे ट्रॅव्हल्स चालकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

Web Title: marathi news jalgaon travels fire