"आवडीचे चॅनल निवडी'च्या स्वातंत्र्यास हरताळ! 

"आवडीचे चॅनल निवडी'च्या स्वातंत्र्यास हरताळ! 

जळगाव : "ट्राय'ने नागरिकांना आपल्या आवडीचे चॅनल बघण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र, ग्राहकांना या धोरणानुसार 154 रुपयांमध्ये शंभर चॅनल्स दाखविले जाणार आहेत. यात ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडता येणार नसून, आवडीचे चॅनल निवडण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांना मनोरंजनासाठी अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल. 

टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ग्राहकांनी मार्चअखेरपर्यंत चॅनल निवडीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आवडीचे चॅनल पाहायचे आहे, त्याचेच पैसे मोजावे लागणार, हे "ट्राय'चे धोरण आहे. मात्र, "ट्राय' ग्राहकांना देत असलेल्या सेवेच्या मोबदल्यात त्यांच्याकडून 154 रुपये सेवाशुल्क म्हणून घेत आहे. त्याच्या मोबदल्यात अनावश्‍यक असलेले शंभर चॅनल्स ग्राहकांच्या माथी मारले जाणार आहेत; त्याचबरोबर ग्राहकांच्या आवडीच्या चॅनल्ससाठी त्यांना पैसेदेखील मोजावे लागणार असल्याने "ट्राय'कडून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे चित्र निर्माण होत आहे. 

"जीएसटी'चा अतिरिक्त भार 
टीव्ही चॅनल नागरिकांच्या मनोरंजनाचे एक साधन आहे. ग्राहकाने निवड केलेल्या चॅनलवर "ट्राय'कडून 18 टक्के "जीएसटी' लावला असल्याने त्याचा अधिक भार ग्राहकांवर पडणार आहे. अगोदरच "ट्राय'च्या नियमामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले असून, त्यात अजून "जीएसटी'चा भार असल्याने मनोरंजन आता सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

"फ्री टू एअर'मध्ये फसवणूक 
"ट्राय'च्या नियमानुसार वसूल केल्या जाणाऱ्या सेवाशुल्काच्या बदल्यात ग्राहकांना "फ्री टू एअर चॅनल' दाखविले जाणार आहे. यामध्ये दाखविण्यात येणारे चॅनल्स हे बातम्यांसह धार्मिक कार्यक्रमांचे आहे. त्यामुळे "फ्री टू एअर' चॅनल्सही वसूल केल्या जाणाऱ्या सेवाशुल्काच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक आहे. 

ग्राहकांमध्ये संभ्रम 
सद्य:स्थितीत ग्राहकांना प्रचलित व लोकप्रिय चॅनल्ससाठी दरमहा 200 रुपयांत, तर "एचडी'साठी 360 रुपये आकारले जात होते. त्यात 400 चॅनल्स दिसत होते. मात्र, "ट्राय'च्या धोरणानुसार एवढेच चॅनल्स बघण्यासाठी तब्बल 650 ते 800 रुपये दरमहा मोजावे लागतील. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. 

चॅनल निवडीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली "ट्राय'कडून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे; याचसोबत चॅनल निवड करताना ग्राहकांना आपला "बजेट' बघून त्याची निवड करावी लागत आहे. 
- दीपक फालक, संचालक, "ह्याथवे' सर्व्हिस प्रोव्हायडर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com