जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण; दोघांचाही मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

जळगाव येथील कोरोना हॉस्पिटल अर्थात शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास धुळे येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडून अहवाल सकाळीच प्राप्त झाले. नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगाव ः कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे. रात्री उशिराने चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. यानंतर आज सकाळीच आणखी दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज प्राप्त अहवालातील एक पाचोरा येथील पुरूष आणि दुसरा अमळनेर येथील महिलेचा समावेश असून दोघांचाही मृत्यू झाला आहे. 
जळगाव येथील कोरोना हॉस्पिटल अर्थात शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास धुळे येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडून अहवाल सकाळीच प्राप्त झाले. नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एक रूग्ण हा पाचोरा येथील 92 वर्षीय पुरूष आहे. तर एक अमळनेर येथील 90 वर्षीय महिला आहे. या दोन्ही रूग्णांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे 

दवाखान्यात येण्यापुर्वीच मृत्यू 
पाचोरा येथील पुरूष रूग्णाचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. तर अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेचा काल मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 24 वर पोहचली असून यापैकी नऊ रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे. 

पहाटेच पॉझिटीव्ह 
जळगावकरांना कोरोनाचा एक झटका म्हणजे शहरातील जोशी पेठेतील एक जण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. यामुळे शहरात देखील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पाचोऱ्यात देखील पहिला पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने तेथे देखील खळबड उडाली आहे. हे रिपोर्ट सकाळीच आल्याने जिल्हावासीयांना सकाळी उठल्या उठल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्या वाढल्याचा झटका बसला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon two new positive case report death