Union Budget 2020 : "स्टार्टअप'ने मिळावा उद्योग उभारणीचा "स्टार्ट' 

Startup
Startup

जळगाव : लहान उद्योगधंदे यापूर्वी देखील सुरू झाले, चालवले गेले. पण आज तरुणाईला भुरळ पडली ती "स्टार्टअप' संकल्पनेची. या संकल्पनेने जणू काही स्टार्टअपची क्रेझच निर्माण झाली. यातून अनेक युवकांनी आपला स्वतःचा उद्योग उभारणीचा मानस केला. अर्थात एका लहानशा युक्तीतून उद्योगाची सुरवात झाली. अर्थात स्टार्टअप उद्योग सुरू करण्याच्या कामाला गती मिळाली. परंतु उद्योग सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. याची सुरवात कर्ज मंजुरीपासून होत असते. या अडचणी दूर करण्यासाठी जास्त जाचक अटी-शर्ती न लावता यामध्ये सरळ सुलभता येणाऱ्या अर्थसंकल्पातून आल्यास उद्योग उभारणीला खऱ्या अर्थाने "स्टार्टअप' मिळू शकेल; अशा अपेक्षा स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग सुरू करणाऱ्या नवउद्योजकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केल्या. 
 

संबंधीत बातमी - Union Budget 2020 :जगाच्या स्पर्धेत विद्यार्थी टिकविणारी शिक्षण प्रणाली हवी
"जीएसटी' कमी करावा 
हर्षल इंगळे
ः चटई उत्पादनाचा लघुउद्योग दोन वर्षांपूर्वी सुरू केला. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवीन उद्योग उभारणीस चालना देण्याचे काम आहे. परंतु उद्योग उभारणीस लागणारे भांडवल आणि कच्च्या मालावरील "जीएसटी'मुळे परवडत नाही. चटई उद्योगासाठी कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात आवश्‍यकता असते. यावर खूप मोठ्या प्रमाणात जीएसटी भरावा लागतो. यामुळे जीएसटी कमी झाल्यास नवउद्योजकांना फायद्याचे ठरेल. तसेच जास्तीत जास्त नवीन उद्योग कसे उभे राहतील. या प्रक्रियेला गती द्यायला हवी. 
 
जाचक अटी रद्द कराव्या 
गौरव वाणी ः
नोकऱ्या नसल्याने उद्योग उभारणी करून बेरोजगारी दूर करता येते. यासाठी सरकारने स्टार्टअप इंडिया ही संकल्पना राबविण्यास सुरवात केली. या संकल्पनेतून युवा उद्योजक तयार होण्यास मदत होईल. त्यास गती मिळायला हवी. शिवाय, उद्योग उभारणीसाठी जास्तीच्या जाचक अटी न लावता सरळ आणि सुटसुटीत कारभार झाल्यास नवउद्योजकास चालना मिळू शकेल. 

कर्ज सहज उपलब्ध व्हावे 
राहुल पाटील
ः स्टार्टअपच्या माध्यमातून धानोरा येथे फर्टीलायझरचा व्यवसाय सुरू केला. पण हा व्यवसाय सुरू केल्यानंतर मार्केटमध्ये काय अडचणी येतात, त्याचा अनुभव मिळाला. म्हणजे उद्योग सुरू केल्यानंतर देखील अपेक्षित असे मार्केट मिळू शकत नाही. याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा. शिवाय, नवीन उद्योग उभारणीसाठी सर्वात प्रथम कर्जाची आवश्‍यकता असते. युवकास हे कर्ज सहज उपलब्ध व्हायला हवे. त्याचप्रमाणे उद्योग सुरू केल्यानंतर पदरी निराशा यायला नको; म्हणून सर्व व्यवहार सुरळीत करून एक चांगले मार्केट देखील मिळायला हवे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com