विद्यापीठातर्फे दोन प्राचार्यांची मान्यता रद्द 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

जळगाव : "युजीसी"ने 2010 ला लागू केलेल्या नियमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत अकरा प्राचार्यांची पाच वर्ष कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, यापैकी दोन प्राचार्यांनी मुदत संपल्यानंतरही पुर्ननियुक्तीची प्रक्रिया राबविली नसल्याने दोन प्राचार्यांनी मान्यता रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला. 

"यूजीसी"तर्फे प्राचार्य भरतीबाबत 2000 मध्ये नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना हा नियम लागू करण्यात आल्यानंतर हा नियम सन 2010 साली विद्यापीठातर्फे अमलात आणला. यावेळी विद्यापीठांतर्गत अकरा प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती पाच वर्षांकरिता होती. या कालावधीत काही सेवानिवृत्त झाले. तर काहींच्या कामाचा कालावधी संपुष्टात आल्याने ते जुन्या पदावर रुजू झाले होते. यापैकी काही प्राचार्यांनी नियमावलीचे पालन करत पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर आवश्‍यक ती पूर्तता केली. शिवाय चार प्राचार्यांनी पुर्ननियुक्ती प्रक्रिया केली नसल्याने त्यांना वर्षभरापूर्वी पत्र पाठविण्यात आले होते. यात भुसावळ, शहादा, नंदुरबार आणि अक्कलकुवा येथील प्राचार्यांचा समावेश होता. यापैकी अक्कलकुवा व नंदुरबार येथील प्राचार्यांनी राजीनामा दिला. तर भुसावळ व शहादा येथील प्राचार्यांनी कोणत्याही नियमांचे पालन केल्याने विद्यापीठातर्फे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी सांगितले. विद्यापीठातर्फे मान्यता रद्द झालेल्यांमध्ये भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा आणि शहादा येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांचा समावेश आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon univercity two princhipal cancal permition