राज्यात विजेच्या मागणीत हजार मेगावॉटने वाढ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

राज्यात विजेच्या मागणीत हजार मेगावॉटने वाढ! 

जळगावः एप्रिल आणि मे महिन्यात विजेच्या मागणीत वाढ होत असते. हीच परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली असून, दहा दिवसात राज्यात एक हजार मेगावॉट इतक्‍या विजेची मागणी वाढली आहे. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यास भारनियमनाचे संकट ओढविण्याची शक्‍यता आहे. 

उन्हाळा असल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत अधिक वाढ झाल्याने उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी एसी, कुलरचा वापर वाढतो. कृषिपंप देखील चालत असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत विजेची मागणी अधिक होत असते. यामुळे बऱ्याचदा मागणी अन्‌ पुरवठा यात तफावत निर्माण होत असते. राज्यात ही परिस्थिती पुन्हा उद्‌भविण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

एक हजार मेगावॉटची वाढ 
"महावितरण'च्या वीज ग्राहकांकडून होणाऱ्या विजेचा वापर लक्षात घेता राज्यभरातून नियमित विजेची मागणी ही 18 हजार 600 मेगावॉटच्या जवळपास असते. परंतु दहा दिवसात विजेच्या मागणी एक हजार मेगावॉटने वाढ होऊन आजच्या स्थितीला 19 हजार 560 मेगावॉट इतकी मागणी झाली आहे. तर जळगाव जिल्ह्यातून रोज साधारण 950 मेगावॉट इतक्‍या विजेची मागणी होत असून, आज एक हजार मेगावॉटपर्यंत विजेची मागणी झाली आहे. 

भारनियमनचे संकट 
विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यास "लाइन लॉस'चे प्रमाण सध्या वाढत जाते. परिणामी ई, एफ आणि जी या ग्रुपमध्ये येणाऱ्या फिडरवर आठ ते दहा तासांचे भारनियमन करण्यास सुरवात होत असते. गतवर्षी मे महिन्यात विजेची मागणी 23 हजार मेगावॉटपर्यंत पोहचल्याने मागणी आणि पुरवठा यात साधारण पाच हजार मेगावॉटपर्यंतची तफावत झाल्याने आठ ते बारा तासांचे भारनियमन सुरू झाले होते. हीच परिस्थिती आता निर्माण झाल्यास महिनाअखेरपर्यंत भारनियमनाचे संकट उभे राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

आकडे बोलतात... 

राज्यात विजेची रोजची मागणी.....18 हजार 600 मेगावॉट 
सध्याची मागणी............19 हजार 560 मेगावॉट 

जिल्ह्यातील मागणी.......950 मेगावॉट 
आताची मागणी............1000 मेगावॉट 
---------- 

Web Title: marathi news jalgaon vadha