Vidhan sabha 2019 : जळगावातून कॉंग्रेसतर्फे उमेदवारी कुणाला? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

जळगाव ः कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांपैकी जळगाव व रावेर या दोन जागा कॉंग्रेसच्या मिळाल्या आहेत. यात रावेरचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जळगावातून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पक्षातर्फे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आहे. तथापि, कॉंग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी हे जळगाव शहरमधून प्रमुख दावेदार आहेत. 

जिल्ह्यात रावेर व जळगाव मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहे. पक्षातर्फे दिल्ली येथून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात रावेरमधून माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, जळगाव शहर मतदारसंघातून पक्षातर्फे अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. दुसऱ्या यादीत जळगावच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

कॉंग्रेसतर्फे पक्षाचे जिल्हामहानगराध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी हे उमेदवारीचे दावेदार आहेत. जळगावातील नागरी समस्यांसाठी ते लढा देत आहेत. "जळगाव फर्स्ट'या संघटनेच्या माध्यमातूनही त्यांनी जळगावच्या समांतर रस्त्यांच्या प्रश्‍नासाठी लढा उभारला होता. या शिवाय शहरातील रस्त्यातील खड्डे तसेच इतर समस्यांवरही त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवाज उठविला. महागाई, पेट्रोल दरवाढ यांच्या विरोधातही त्यांनी पक्षातर्फे आंदोलन केले आहे. जळगाव शहरात कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचे कामही त्यांनी केले आहे. त्यामुळे जळगावच्या उमेदवारीत त्यांचा दावा महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्यावेळी त्यांनी पक्षातर्फे उमेदवारी केली होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र लढल्याने मताचे विभाजन झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत असल्याने कॉंग्रेसला फायदा होण्याचाही त्यांचा दावा आहे. मात्र, कॉंग्रेसतर्फे जळगावातून जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्यासह दोघांनी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे पक्षातर्फे कोणाला उमेदवारी जाहीर होणार, याकडेच लक्ष आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vidhansabha election congress candidate