शेफ विष्णू मनोहर करणार वांग्याच्या भरिताचा विक्रम 

शेफ विष्णू मनोहर करणार वांग्याच्या भरिताचा विक्रम 

जळगाव ः मराठी प्रतिष्ठान व महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खानदेशच्या वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्याचा ध्यास घेतला असून, अडीच हजार किलो वांग्याचे भरीत तयार करून गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीसाठीचा विक्रम 21 डिसेंबरला केला जाईल, अशी माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सचिव विजय वाणी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

खानदेशी वांग्याच्या भरिताला आगळीवेगळी चव आहे. त्यामुळे या भरिताची सातासमुद्रापार ओळख व्हावी, या उद्देशाने 3 हजार 200 किलो वांग्याचे भरीत तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वांग्याचे भरीत बनविण्याचा विश्‍वविक्रम करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी सागर पार्कवर हे भरीत बनविले जाणार आहे. वांग्याच्या भरिताची गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयार सुरू असून, भरीत तयार करण्याच्या पद्धतीचे सुरवातीपासून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेवेळी मराठी प्रतिष्ठानचे आर्किटेक्‍ट शिरीष बर्वे, निलोफर देशपांडे, अनुराधा रावेरकर, संध्या वाणी आदी उपस्थित होते. 

भरितासाठी बामणोदची वांगी 
भरितासाठी यावल तालुक्‍यातील बामणोद येथून 3 हजार 200 किलो वांगी आणण्यात येणार आहेत. भरीत बनविण्यासाठी लागणारी 10 बाय 10 फुटाची कढई कोल्हापूर येथून बनविण्यात येणार असून, या कढईचे वजन 450 किलो असणार आहे. भरीत बनविण्यासाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना अस्सल खानदेशी भरीत बनविणारे देवराम भोळे व दत्तू चौधरी हे सहकार्य करणार आहे. भरितासाठी पाच फूट पाते व दहा फूट दांडी असलेल्या सरोटा भरीत बनविण्यासाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com