नागरिकांना शुध्द पाणी देण्याचे शासनाचे ध्येय : बबनराव लोणीकर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

जळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत योजनेच्या भूमीपुजन कार्यक्रमात सांगितले. 

जळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत योजनेच्या भूमीपुजन कार्यक्रमात सांगितले. 

जळगाव शहरास केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेच्या जलवाहिनी योजनेच्या कामांचे काव्यरत्नावली चौकातील भाऊच्या उद्यानात झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर ललित कोल्हे, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार डॉ. सतीष पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंदूलाला पटेल, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला अमृत योजनेच्या भूमीपुजन पालकमंत्री पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरांनी अमृत योजनेच्या कामांचे प्रास्ताविकेतून योजनेच्या कामांचा आढावा सादर केला. पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले, की तसेच ग्रामीण 
भागात पाण्याच्या समस्या वाढत असून केंद्राकडून येणाऱ्या अपूऱ्या निधीतून हा सोडविता येत नाही. शंभर दिवसाचा पाऊस शंभर तासावर आला आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे लातूर शहराला रेल्वे पाणीपूरवठा करण्याची वेळ आली. त्यामुळे अमृत योजन सारख्या आणखी योजना राज्यात राबवून राज्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असे सांगितले. 

दोन वर्षात अमृतचे पूर्ण होणार 
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल अमृत योजना आणली. त्यात राज्यातील महत्वाची पाण्याची टंचाईचे 44 शहरामध्ये जळगावचा समावेश असून 249 कोटी निधीच्या कामांचा भूमीपुजन झाले असून जळगावकरांना दोन वर्षात याचा लाभ मिळणार आहे. 24 तास पाणी, जेवढे पाणी वापराल तेवढेच पैसे मोजावे लागतील असे अध्यक्षीय भाषणातून पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. 

हुडको, गाळे प्रश्‍नावर तोडग्यासाठी पालकमंत्र्याना साकडे 
महापौर कोल्हे भाषणातून बोलतांना म्हणाले, अमृत योजनेचे कामाला सुरवात होत असून याचा फायदा नागरिकांना होणार आहे. शहराच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे आज प्रश्‍न मांडणार होते परंतू ते आज येऊ शकले नाही. महापालिकेची हुडकोच्या कर्जामुळे झालेली आर्थिक कोंडी, तसेच गाळे प्रश्‍न हा गाळेधारक व मनपाचे हित जोपासून घ्यावे अशी मागणी पालकमंत्री यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यानी सोडवावी असे म्हणाले. 
 

Web Title: marathi news jalgaon water babanrao lonikar