धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

जळगाव ः पाऊस कमी पडल्याने वाघूर धरणातील केवळ 46 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणी शेतीला न देता ते पिण्यासाठी दिल्यास जळगाव शहराला पाणी टंचाई निर्माण होणार नाही. त्यामुळे याबाबत संबंधित विभागाला माहिती द्या अशी सूचना महापौर सीमा भोळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

जळगाव ः पाऊस कमी पडल्याने वाघूर धरणातील केवळ 46 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणी शेतीला न देता ते पिण्यासाठी दिल्यास जळगाव शहराला पाणी टंचाई निर्माण होणार नाही. त्यामुळे याबाबत संबंधित विभागाला माहिती द्या अशी सूचना महापौर सीमा भोळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

महापालिकेत आज महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली घनकचरा, अमृत योजना, बांधकाम, पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक झाली. पाण्याचे नियोजन न झाल्यास एैन दिवाळी तसेच उन्हाळ्यात पाणी 
पुरवठा तीन दिवसांआड होऊन पाणी टंचाई होऊ शकते. त्यामुळे धरणातील पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच टंचाई काळात महापालिका प्रशासनाने धरणातील डाऊन स्कीम योजनेचा महापौरांनी आढावा घेतला. यात डाऊन स्कीम जलवाहिन्या काढून सुरक्षित ठेवल्या असल्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक धीरज सोनवणे, चेतन सनकत, किशोर बाविस्कर, दिलीप पोकळे संबंधित अभियंते उपस्थित होते. 
........ 
या विषयावर झाली चर्चा 
मंजूर अमृत योजने अंतर्गत जलवाहिनीच्या कामांचे आढावा घेऊन नळ जोडणीच्या तक्रारींबाबत आढावा घेतला. तसेच रस्ते दुरुस्तीसाठी नवीन ट्रॅक्‍टर खरेदी करून कामांना गती वाढवणे, रस्त्यातील दुभाजक सुशोभिकरण करणे, मनपाच्या शाळांमधील खुले स्वच्छता गृह बंदिस्त करणे, शहरातील स्वच्छता, मनपा इमारत प्रसाधन गृहांची साफसफाई बाबत आरोग्य विभागाला तर साथरोगांबाबत रुग्ण आढळलेल्या परिसरात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. वाहन विभागात पुरेसे कर्मचारी नसल्याने अनेक कामांना विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: marathi news jalgaon water dam riserv