भरदुपारच्या कडक उन्हात रस्त्यावर महिला बाळंतीण

live photo
live photo

जळगाव : खांदेशसेट्रल मॉलच्या गोविंदा रिक्षास्टॉप कडील प्रवेशद्वारा जवळ दुपारी एकच्या कडक उन्हात वेडसर महिला रस्त्यावर बाळंत झाल्याची घटना घडली. अंगाची लाही-लाही करणाऱ्या 45 अंश सेल्सीयस तापमानात मुलीला जन्म दिलेल्या अवस्थेत हि महिला बसलेली असंतांना येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष तिच्याकडे गेल्यावर एका तरुणाने मदतीसाठी पोलिस, ऍम्बुलन्ससह जवळपासच्या हॉस्पीटलमध्ये मदत मागीतली. मात्र, बराचवेळ होवुनही कोणी आले नाही. अखेर पोलिस व प्रसारमाध्यमांचे प्रतिनीधी घटनास्थळावर पोहचल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयातून 108 ऍम्बुलन्स व डॉक्‍टर बोलावल्यावर बाळासह बाळंतीणीला जिल्हारुग्णालयात नेण्यात आले. 

शहरातील मध्यवर्ती ठिकाण खान्देश सेंट्रलच्या दक्षिणेकडील प्रेवशद्वार असलेल्या गोविंदा रिक्षास्टॉप जवळ रसत्याच्या बाजुला साधारण 25-30 वर्षीय वेडसर महिला घुटमळत होती. भर दुपारी एक वाजेच्या सुमारास हि वेडसर महिला होती त्याच ठिकाणी बाळंत झाली. खालीमान घालून बसेल्या अवस्थेतच तीने बाळाला जन्म दिल्याने रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे कोणाचे लक्षही तीच्याकडे जात नव्हते. मात्र, सहज नजरेस पडली म्हणुन दुचाकस्वार विश्‍वेश सुवर्णकार पाहताच दचकला, महिलेने बाळाला जन्म दिल्याचे त्याने मदतीला हाका मारल्या मात्र कुणी मदतीला आले नाही. म्हणुन जिल्हा रुग्णालय, नंतर पोलिस आणि सर्वांत शेवटी प्रसार माध्यमांच्या छायाचित्रकारांना फोनवर कळवल्यावर माध्यम प्रतिनीधी पाठोपाठ सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही, अनिता वाघमोर, अमोल विस्पुते, आशिष शेलार, रतन गिते आदीसंह धडकले. इकडे विश्‍वेशने मनपाच्या शाहुरुग्णालयात धाव घेतली, मात्र येथे स्टाफ नसल्याने येण्यास स्पष्ट शब्दातून नकार देण्यात आला. अखेर माध्यम प्रतीनीधींनीच ऍम्बुलन्स यंत्रणेसह जिल्हा शल्यचिकीत्सकांना फोन लावल्यावर साधारण 45 मिनटांनी 108 ऍम्बुलन्स आली. डॉक्‍टरांनी शास्त्रीय पद्धतीने "वार' कापल्यावर बाळंतीणीसह नवजात बालीकेला घेवुन जिल्हा रुग्णालयात रवाना झाले. 

नुसतीच बघ्यांची गर्दी 
भरदुपारच्या कडक उन्हात वेडसर महिला रस्त्याच्याकडेला बाळंतीण झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या बघ्यांनी गर्दी केली होती. जवळच रिक्षास्टॉप असून एकही रिक्षाचालक स्वताहुन रिक्षाघेवून आला नाही. गर्दीत मात्र उभे होते, समोरच एका एमडी डॉक्‍टरचाही दवाखाना आहे..त्याच्याकडेही कोणी मदतीला नसावे, खांदेशसेट्रल मधुन निघत असल्या प्रेट्रीसा हैसीयत या महिलेने पुढेयेवुन बघताच ती हबकली, गर्दीला उद्देशुन खेकसलीही मात्र याच गर्दीतील काही तरुण मदतीसाठी ऍम्बुलन्स, पोलिस, डॉक्‍टरांना फोन करणारे होते, महिला पोलिस अनिता व पेट्रीसाने ऍम्बुलन्स आल्यावर बाळंतीणीला उचलून गाडीत बसवले. 

पिडीतेवर अत्त्याचाराचा संशय 
पिडीता रेल्वेस्थानक, खादेशसेंट्रल परिसरात भटकंती करुन पोटापुरती भिक्षा मागणारी वेडसर महिला असल्याचे परीसरातील तरुणांचे म्हणणे होते, अंगावर फटके कपडे, डोक्‍याच्या केसांचा गुंता झाल्याने अवस्थेवरुन ती वेडसर दिसत होती. तिच्यावर अत्त्याचार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांतर्फे पावले उचलण्यात येणार आहे. 
 
बाळंतीण मध्यप्रदेशातील.. 
जिल्हा रुग्णालयात बाळ व बाळंतीण दाखल झाल्यावर, मुलगी असलेल्या बाळाचे वजन 2 किलो 525 ग्रॅम इतके भरले, बाळंतीणीची ओळख पटवण्यासाठी रुग्णालयातील एका आदीवासी महिलेच्या माध्यमातून विचारपुस केल्यावर नाव अनिता मंगेश बारेला (रा.खरगोन, जिल्हा बडवानी मध्यप्रदेश) असल्याचे ती सांगते...काही दिवंसापासुन ती जळगावातच रेल्वेस्थानक परिसरात उघड्यावर, धर्मशाळे जवळ असऱ्याला होती, पती संदर्भात ती त्रोटक माहिती सांगत असून पोलिसांच्या तपासात इतर बाबींचा उलगडा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com