नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पारोळा : मोरफळ (ता. पारोळा) येथे नवविवाहिता ललिता अशोक पाटील (वय 20) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. सांगवी (ता. पाचोरा) हे त्यांचे माहेर आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. 

गेल्या 24 एप्रिलला त्यांचा मोरफळ येथे विवाह झाला होता. त्यानंतर 25 एप्रिलला त्या माहेरी होत्या. त्यानंतर शनिवारी (ता. 5 मे) त्या मोरफळ येथे सासरी आल्या होत्या. त्यांचे पती अशोक पाटील व सासरे हे दोन्ही शेतात कामाला गेले होते. त्यांच्या सासू घराच्या बाहेर गेलेल्या होत्या. घरात एकट्या असताना त्यांनी छताला दोरीने गळफास घेतला. त्यांचे शिक्षण बारावी झाले असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: marathi news jalgaon woman suicide