यंदा गव्हाचा दर्जा सुधारला 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

यंदा गव्हाचा दर्जा सुधारला 

जळगाव : वर्षभरासाठी लागणाऱ्या धान्याची खरेदी नागरिकांनी सुरू केली असून, दररोज धान्य बाजारात लाखोंची उलाढाल सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून गव्हाची आवक कमी झाल्याने नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागले होते. यंदाही स्थानिक आवक घटली असली, तरी इतर राज्यांतून होणारी गव्हाची आवक वाढली आहे. मध्य प्रदेशातून गव्हाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून, त्याचा दर्जा उत्तम असल्याने ग्राहकांचेही समाधान होत आहे. 

शहरात रोज गव्हाचे 25 ते 30 ट्रक येत असून, यात लोकवन, वन फोर सेव्हन, चंदोसी, शरबती या गव्हाचा समावेश आहे. बाजार समितीतून सुमारे 400 ते 500 गोण्यांची विक्री होत असून, यात सर्वाधिक गोण्या "लोकवन' व "वन फोर सेव्हन' प्रकारच्या गव्हाच्या आहेत. "लोकवन'चे दर सर्वांत कमी असल्याने ग्राहक या गव्हाचीच अधिक मागणी करीत आहेत. दरम्यान, बाजार समितीतही दररोज गहू खरेदीत लाखोंची उलाढाल होत आहे. 

बाजारपेठेत चार प्रकारचा गहू उपलब्ध असून, यात सर्वसामान्यांना परवडणारा गहू म्हणजे लोकवन. किमतीत सर्वांत कमी असणारा हा गहू राजस्थान व मध्य प्रदेशातील खंडवा, रतलाम येथून मागविला जात आहे. दर्जा चांगला असलेला व सर्वाधिक मागणी असलेला "वन फोर सेव्हन' गव्हाचे खांडवा, हरदा, रतलाम येथे उत्पादन होते; तर "चंदोसी' व "शरबती' हा उच्चतम दर्जाचा गहू असल्याने त्याचा दरही सर्वाधिक आहे. 
------- 
चौकट 
गव्हाची आवक व दर (प्रतिक्विंटल) 

- लोकवन ः 1000-1100 ....... 2100-2400 रुपये 

- वन फोर सेव्हन ः 900-1000 ....2150-2250 
- चंदोसी : 800-900 ...... 3400-3600 
- शरबती : 700-800 .........2300 ते 2500 
----------------- 

कोट

यंदा गव्हाची स्थानिक आवक घटली आहे. स्थानिक पातळीवर थोड्याफार प्रमाणात गव्हाचे उत्पादन होत आहे. परंतु, शेतकरी तो गहू आपल्या गावाकडेच विकत आहेत. त्यामुळे शहरात स्थानिक गव्हाची आवक होत नाही. याउलट मध्य प्रदेशातून होणारी गव्हाची आवक वाढली असून, यंदाही दर्जाही उत्तम आहे. 
- प्रवीण पगारिया, (गव्हाचे व्यापारी) 

Web Title: marathi news jalgaon yanda